इचलकरंजी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे आमदारांच्या पाहणी (visit)दौऱ्यात सहाय्यक तलाठी ऑन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे उघड झाले आहे. ही घटना इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांच्या विकासकामांच्या पाहणीदरम्यान घडली. कार्यालयीन वेळेत मद्यधुंद अवस्थेत शासकीय अधिकारी हजर असल्याचे दिसताच आमदार आवाडेंचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर थेट कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सदर मद्यधुंद अवस्थेत सापडलेला अधिकारी म्हणजे सहाय्यक तलाठी आनंदा डवरी असून, तो आपल्या कार्यालयात ड्युटीवर उपस्थित होता. मात्र, आमदारांच्या पाहणीदरम्यान त्याची नशेतील अवस्था स्पष्टपणे दिसत होती. या घटनेमुळे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही एकच खळबळ उडाली.

स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळात या घटनेची तीव्र चर्चा सुरू झाली आहे. शासकीय अधिकारीच जर कार्यालयीन वेळेत अशा अवस्थेत आढळत असतील, तर सामान्य नागरिकांची कामे वेळेत (visit)आणि योग्य पद्धतीने कशी होतील, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.या घटनेनंतर आमदार राहुल आवाडे यांनी संबंधित अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून, या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली आहे. इचलकरंजीतील हा प्रकार शासकीय यंत्रणेच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.
हेही वाचा :
डिसेंबरमध्ये होणार IPL 2026 चा लिलाव…
साखर कामगारांसाठी आनंदाची बातमी! 10 टक्क्यांची होणार वेतनवाढ
दिवाळी निमित्त किल्ला स्पर्धेत जय हनुमान गणेशोत्सव मंडळाने पटकावला द्वितीय क्रमांक…
