आज महिन्याच्या पहिला दिवस पहिल्याच दिवशी सोन्याच्या(Gold) दरात घसरण झाली आहे.नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच सराफा बाजारात सोन्याच्या दरात थोडी नरमाई दिसून आली आहे. तर, एकीकडे चांदीच्या किंमतीत उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या वायद्यात नरमाई दिसून येत आहे.सोन्याचा वायदा 0.5 टक्क्यांनी कमी होऊन 4,004 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. डिसेंबरच्या वायद्यासाठी अमेरिकेचा सोन्याचा वायदा 4,016.70 डॉलर प्रति औंसवर स्थिरावला आहे.

देशांतर्गंत बाजारात सोन्याच्या(Gold) भाव कालच्या तुलनेने आज अधिक कमी झाला आहे. आज देशात 1 नोव्हेंबर 2025 रोजी 24 कॅरेट एक ग्रॅमचा भाव 12.315 रुपये इतका आहे. तर, देशात चांदीच्या दरांबाबत बोलायचे झाल्यास शुक्रवारी 1,51,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज देशात चांदीचा दर 152 रुपये प्रति ग्रॅम आणि 1,52,000 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. या दरम्यान 1000 रुपयांची वाढ झाली आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोन्याच्या किंमत 1,23,000 रुपये इतकी आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा भाव 1,12,750 रुपयांवर स्थिरावला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा भाव 92,250 रुपयांवर स्थिरावला आहे.
आजचा सोन्याचा भाव काय?
- 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,000 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,250 रुपये - 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,275 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,300 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,225 रुपये - 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 90,200 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 98,400 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 73,800 रुपये - मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,000 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,250 रुपये
हेही वाचा :
S*x Toy अन् तसले व्हिडिओ…; लंडनहून यायचा अन् 10 वर्षांच्या चिमुरडीसोबत…
राजकीय पटावर आजचा दिवस गाजणार! मतचोरी विरोधात वादळ पेटणार
निवडणुका लढवू इच्छिणाऱ्यांना मोठा झटका; राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय