कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
मत चोरी आणि सदोष मतदार याद्या याबद्दल विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना राज्य निवडणूक आयोगानेसमाधानकारक उत्तरे दिली पाहिजेत. तसे झाले नाही तर मात्र सर्वसामान्य जनतेचा निवडणूक प्रक्रिये वरचा विश्वास उडेल. शनिवारी मुंबईत निघालेल्या”सत्याचा मोर्चा”च्या वतीने निकोप लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिये बद्दल जे भाष्य करण्यात आले ते दुर्लक्षित करता येणार नाही(Commission).गेल्या चार-पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिनांक 31 जानेवारी पूर्वी घेण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीबद्दल प्राथमिक पातळीवरची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तथापि महाविकास आघाडी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी मत चोरी चा मुद्दा उपस्थित करून सदस्य मतदार याद्यांवर जोरदार आक्षेप नोंदवलेला आहे.

जोपर्यंत सदोष मतदार याद्या निर्दोष केल्या जात नाहीत, सुधारल्या जात नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत. आणखी एक वर्षानंतर निवडणुका झाल्या तर फारसे काही बिघडणार नाही अशी भूमिका शनिवारी काढण्यात आलेल्या “सत्याचा मोर्चा “च्या वतीने घेण्यात आली आहे. हा मोर्चा राज्य निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ असल्याचे मोर्चाच्या आयोजकांच्याकडून सांगितले गेले (Commission)असले तरी हा मोर्चा सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध होता हे मान्यच करावे लागेल. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी मुंबईत मुक आंदोलन करण्यात आले.भिवंडी येथील साडेचार हजार मतदारांनी मुंबईतील मलबार हिल येथे विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते असे पुराव्यासह राज ठाकरे यांनी शनिवारी सांगितले.
याशिवाय नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाच्या सिटी सर्वे नंबर वर मतदारांची झालेली नोंद, सुलभ शौचालयाच्या सिटी सर्वे नंबर वर साडेचारशे मतदारांची झालेली नोंद, झालेले बोगस मतदान याचे काही पुरावे या मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले. वास्तविक हे गंभीर आहे आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई केली पाहिजे. निवडणूक आयोगाला हे करता येऊ शकते. सदोष मतदार याद्या रद्द करता आल्या नाहीत तरी त्यातील काही चुकांची दुरुस्ती करता येऊ शकते. गेल्यात दिड दोन महिन्यांपासून मतदार यादीतील घोळाबद्दल राजकीय पक्षांकडून तक्रारी सुरू आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी महायुती मधील काही नेत्यांनी सुद्धा मतदार यादी यांच्या बद्दल तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे मतदार नोंदणी आणि मतदार याद्या यामध्ये गंभीर त्रुटी आहेत हे स्पष्ट होताना दिसते आहे.
शनिवारच्या “सत्याचा मोर्चा”मध्ये ठाकरे शिवसेना आणि मनसे चे कार्यकर्ते प्रचंड संख्येने सहभागी झालेले होते. तुलनेने इतर पक्षांचे कार्यकर्ते कमी होते.मोर्चा प्रचंड होता. महाविकास आघाडीच्या या मोर्चामध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वेगळे अस्तित्व दाखवले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांना सहभागी करून घ्यावे लागेल असा एक संदेश या मोर्चाच्या माध्यमातून आघाडीच्या नेत्यांपर्यंत पोहोचवला गेला आहे राजकारणात राजकीय अस्पृश्यता असता कामा नये हे शरद पवार यांचे अगदी पुलोद काळापासूनचे मत आहे आणि धोरण आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना महाविकास आघाडी मध्ये घेण्यास त्यांचा विरोध असणार नाही.

आजच्या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे राजकारणात विळया भोपळ्या सारखे सख्ख्य असलेले काही पक्ष एकत्र आले होते. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या कधीही जमले नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि कम्युनिस्टांचे नाते विळया भोपळ्यासारखे. बाळासाहेब ठाकरे हे तर कम्युनिस्टंना लाल माकडे असे म्हणायचे.शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस यांचे 2019 पूर्वी कधीही विचार जुळले नाहीत. राजकीय वैचारिक भूमिका भिन्न असलेले (Commission)शिवसेना, मनसे, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस हे राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात एकत्र आलेले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हेच चित्र दिसेल असे नाही.महात्मा गांधी यांचे”सत्याचे प्रयोग”सर्वांनाच माहित आहेत. “सत्याचा मोर्चा”हा प्रयोग मात्र वेगळा होता. गर्दी अफाट होती आणि म्हणूनच शरद पवार यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या आंदोलनाची आठवण यानिमित्ताने आली.
हेही वाचा :
ऊस चाऊन खाताय की रस पिताय? आरोग्यास अधिक प्रभावी काय, घ्या जाणून
iPhone यूजर्ससाठी धक्का…
लोणचं ठरू शकतं ‘विष’; खाण्यापूर्वी ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा