तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात हैदराबादला जाणाऱ्या बसचा एकदम भयानक अपघात (accident)झाला आहे. खडी भरलेल्या ट्रकची राज्य परिवहन महामंडळाच्या बसशी समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, या भीषण अपघातात किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही बस तंदूर डेपोची होती आणि सुमारे 70 प्रवाशांना घेऊन हैदराबादला जात होती.

चेवेल्ला मंडल (ब्लॉक) मधील मिर्झागुडा गावाजवळ हा अपघात(accident) घडला. समोरून येणाऱ्या लॉरीने बसला धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती बस उलटली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, धडक इतकी जोरदार होती की लॉरीतील संपूर्ण खडी बसवर पडली आणि अनेक प्रवासी आत अडकले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार प्रवासी मदतीसाठी ओरडत होते आणि स्थानिक लोक त्यांच्या मदतीसाठी धावत होते.
मृतांमध्ये बस आणि लॉरीचे चालक, अनेक महिला आणि एका 10 महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा बाजूला काढून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तीन जेसीबी मशीन वापरण्यात आल्या.
गंभीर जखमी प्रवाशांना हैदराबादमधील प्रमुख रुग्णालयात पाठवण्यात येत आहे, तर उर्वरित प्रवाशांना चेवेल्ला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहे. बचाव कार्यादरम्यान, चेवेल्ला सर्कल इन्स्पेक्टर भूपाल श्रीधर देखील जेसीबीने जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चेवेल्ला रुग्णालयात दाखल(accident) करण्यात आले आहे. बस कंडक्टर राधासह 15 प्रवाशांना वाचवण्यात पोलिसांना यश आले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. मुख्य सचिव (सीएस) के. रामकृष्ण राव आणि पोलिस महासंचालक (डीजीपी) बी. शिवधर रेड्डी यांना तातडीने बचाव आणि मदत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच जखमींना विलंब न करता चांगल्या वैद्यकीय उपचारांसाठी हैदराबादला हलवण्याचे आदेश दिले.
हेही वाचा :
सत्तेविरुद्ध सत्याचा मोर्चा आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह?
ऊस चाऊन खाताय की रस पिताय? आरोग्यास अधिक प्रभावी काय, घ्या जाणून
iPhone यूजर्ससाठी धक्का…