अनेकांना रोज जेवताना कांदा , लिंबू किंवा लोणचं(Pickled) लागतंच. काहींना तर लोणचं एवढं आवडत की ते जेवणासोबत, किंवा कधी भाजी आवडली नाही तर त्या लोणच्यासोबत चपाती किंवा भात खातात.जेवण कितीही साधं असलं तरी बाजूला आंबट-तिखट असं लोणचं नसेल तर जेवण अपूर्णच वाटते. लोणचं केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर जेवणाला झणझणीत टच देतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हेच लोणचं कधी कधी शरीरासाठी विषासारखाही ठरू शकतं. होय, हे चविष्ट लोणचं तुम्हाला नुकसानकारकही ठरू शकतं.

एका हेल्थ एक्सपर्ट यांच्या मते चुकीच्या पद्धतीने साठवलेलं लोणचं खाल्ल्याने विषबाधा झाली होती. तज्ज्ञांच्या मते, लोणचं योग्य रीतीने प्रिझर्व न केल्यास त्यात घातक बॅक्टेरिया वाढू शकतात आणि ते गंभीर आजारांनाही कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे रोज खाण्यातलं असणारं लोणचं इतक घातक ठरू शकेल याचा विचार पण आपण कधी केलाही नसेल. पण खरंच आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यामुळे विषबाधा होऊ शकते. लोणचं नीट प्रिझर्व्ह नसेल केला, तर त्यामध्ये ‘बोटुलिझम’ नावाचा जीवाणू वाढतो. हा जीवाणू टॉक्सिन्स (विषारी द्रव्ये) तयार करतो, जे शरीरात गेल्यास पॅरालिसिससारखा गंभीर आजार होऊ शकतो. काही वेळा हे जीवघेणंही ठरू शकतं. त्यामुळे लोणचं बनवताना आणि साठवताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक आहे.त्या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊयात.

नेहमी स्वच्छ बरण्यांचा वापर करा : लोणचं(Pickled) साठवताना स्वच्छ आणि स्टेरिलाइज्ड काचेच्या बरण्यांचा वापर करा. काचेची बरणी सर्वोत्तम असते कारण प्लास्टिकमध्ये केमिकल रिस्क असतो आणि मेटलच्या डब्यात रिऍक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून काचेची बरणी उत्तम पर्याय आहे. पण बरणी वापरण्यापूर्वी गरम पाण्याने ती स्वच्छ धुवा आणि पूर्णपणे कोरडी होऊ द्या.असं केल्याने बॅक्टेरिया किंवा फंगस वाढण्याचा धोका कमी होतो.

लोणच्यामधील तेल आणि व्हिनेगर: लोणच्यामधील तेल आणि व्हिनेगर (सिरका) हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह असतात. पण त्यांचं प्रमाण कमी असेल, तर लोणच्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात. नेहमी तेलाची पातळी वरपर्यंत राहतेय का हे तपासा.वरचा भाग कोरडा राहिला, तर फंगस लागण्याचा धोका वाढतो.म्हणून नियमितपणे लोणचं पाहत राहा आणि आवश्यक असल्यास तेल किंवा व्हिनेगर वाढवा.हे लक्षण दिसले तर लोणचं लगेच फेकून द्या: जरलोणचं ही भारतीय जेवणातील चविष्ट परंपरा आहे, पण थोडासा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्याशी खेळ करू शकते. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही घरी लोणचं बनवा किंवा बाजारातून आणा, तेव्हा स्वच्छता, योग्य साठवण आणि प्रमाणबद्ध तेल-व्हिनेगरचा वापर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

हेही वाचा :

लवकरच आचारसंहिता लागणार; निवडणुकांची घोषणा होणार?

आजचा सोमवार ‘या’ राशींसाठी भाग्यशाली

एटीएमचा वापर फक्त पैसे काढण्यासाठी करता?; ‘या’ ७ सेवांचाही घ्या लाभ

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *