देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायंस जिओच्या रिचार्ज प्लॅनबाबत(plan) सतत नवीन अपडेट्स समोर येत असतात. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्सचा समावेश आहे. यामध्ये डेटा प्लॅनपासून फक्त कॉलिंगपर्यंत अनेक प्लॅन्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त कंपनी सतत नवीन रिचार्ज प्लॅन्स जोडत असते. यातील काही प्लॅन्सची किंमत खूप जास्त असते तर काही प्लॅन्सची किंमत युजर्सच्या बजेटमध्ये असते. आता आम्ही तुम्हाला जिओच्या अशा एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर तुम्ही सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी करू शकणार आहात.

जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 189 रुपये आहे. हा प्लॅन बजेट फ्रेंडली आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये युजर्सच्या बेसिक सुविधा जसे कॉलिंग, डेटा आणि एसएमस ऑफर केल्या जातात. सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे, जिओने स्वतःच त्यांच्या वेबसाइटवर या रिचार्ज प्लॅनचे वर्णन अफोर्डेबल प्लॅन(plan) असल्याचे केले आहे. चला जिओच्या या जबरदस्त प्लॅनवर बारकाईने नजर टाकूया . जिओच्या या अफोर्डेबल रिचार्ज प्लॅनची किंमत 189 रुपये आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, एकूण 300 एसएमएस आणि 2GB डेटा ऑफर केला जातो. लक्षात ठेवा या प्लॅनमध्ये कंपनी त्यांच्या युजर्सना एकूण 2GB डेटा ऑफर करत आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये डेली डेटा ऑफर केला जात नाही. डेटाची लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होणार आहे.

या प्लॅनमध्ये इतर अनेक बेनिफिट्स देखील ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये युजर्सना JioTV, JioCinema, आणि JioCloud सारख्या सर्विस ऑफर केल्या जाणार आहेत. कंपनीच्या या बजेट फ्रेंडली प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. हा प्लॅन कमी किंमतीत एका महिन्याची व्हॅलिडीटी ऑफर करणारा एक उत्तम रिचार्ज प्लॅन मानला जात आहे. सिम सक्रिय ठेवण्यासाठी हा प्लॅन एक सर्वोत्तम पर्याय आहे.सध्या 189 रुपयांचा हा जिओ प्लॅन बेस्ट बजेट फ्रेंडली प्लॅन्सपैकी एक मानला जात आहे. ज्यांना फक्त त्यांचे सिम सक्रिय ठेवायचे आहे किंवा मर्यादित कालावधीसाठी स्वस्त प्लॅन शोधत आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय मानला जात आहे. दुसरीकडे, जर या योजनेची तुलना केली तर, बीएसएनएल आणि व्होडाफोन आयडिया (व्हीआय) सारख्या कंपन्या देखील असे काही स्वस्त योजना देतात.
हेही वाचा :
अजित पवारांच्या पक्षाची समर्थकांना थेट तंबी, ‘विषयाच्या संवेदनशीलतेला…’
₹125 कोटी नाही तर BCCI ने भारतीय महिला टीमला दिली एवढी मोठी रक्कम
6 हजारपेक्षा कमी किमतीत सर्वात स्वस्तात मिळतोय ‘हा’ अँड्रॉइड फोन