आज टेक्नॉलॉजी क्षेत्रात नवीन स्मार्टफोन(smartphone) लॉंच झाला आहे. पोको कंपनीने आपली नवीन सिरिज बाजारात लॉंच केली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे ढाबे दणाणले. पोकोने F8 सिरिज लॉंच केली आहे. ज्यामध्ये F8 अल्ट्रा आणि F8 प्रो हे दोन स्मार्टफोन लॉंच करण्यात आले आहेत. यामध्ये कोणकोणते फीचर्स देण्यात आले आहेत ते जाणून घेऊयात.पोको F8 अल्ट्रामध्ये 8 स्नॅपड्रॅगन देण्यात आला आहे. तर F8 प्रोमध्ये मागील जनरेशनमधील 8 स्नॅपड्रॅगन देण्यात आला आहे. पोको F8 अल्ट्रामध्ये 6500 mAh क्षमतेची बॅटरी असून प्रो मॉडेलमध्ये 6210 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अँन्ड्रॉईड 16 हायपरओएस असणार आहे.

आता आपण पोको पोको F8 अल्ट्रा आणि पोको F8 अल्ट्रा प्रो या फोन्सची किंमत जाणून घेऊयात. F8 अल्ट्रा प्रो 12/128 जीबी या फोनची किंमत भारतात 56, 159 रुपये असणार आहे. तर 12/512 जीबी फोनची किंमत जवळपास 51,695 रुपये असणार आहे. तर 12/256 जीबीची किंमत 47,231 रुपये असणार आहे.
पोको F8 अल्ट्राच्या 12/256 या मॉडेलची किंमत 65094 रुपये असणार आहे. तर 12/512 जीबी मॉडेलची किंमत 71,344 रुपये असणार आहे. अल्ट्रा मॉडेल तुम्ही ब्लॅक(smartphone) आणि डेनिम ब्ल्यु तर रंगात खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला ओएलईडी स्क्रीन मिळणार आहे. कॅमेरामध्ये 50 मेगापिक्सेलचा OIS कॅमेरा मिळेल. यामध्ये 32 मेगापिक्सेलचा स्वेल्फी कॅमेरा मिळेल. यामध्ये 5 जी कनेक्टीव्हिटी, वायफाय, एनएफसी आणि अन्य फीचर्स देखील मिळणार आहेत.

हेही वाचा :
शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी…
एका तासाचे किती घेशील?, नॅशनल क्रश अभिनेत्रीला अश्लील मेसेज
महिलेकडून पुरुषावर लैंगिक अत्याचार, गुंगीचं औषध दिलं अन् नंतर….