देशभरातील बँकिंग प्रक्रियेमध्ये आता मोठा बदल लागू करण्यात आला असून नागरिकांनी आपले पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अनिवार्य झाले आहे. आयकर विभागाच्या नियमांनुसार, ज्यांचे पॅन त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले नाही, त्यांना आगामी काळात आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः इनकम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर रिफंड मिळण्यात विलंब होण्याची शक्यता सर्वाधिक (process)आहे.अनेक लोकांचे आयकर परतावे अजूनही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत आणि त्यामागील प्रमुख कारण म्हणजे पॅन व बँक खात्याचे न केलेले लिंकिंग. पॅन लिंक असल्यास आर्थिक व्यवहार, गुंतवणूक, म्युच्युअल फंड, विमा किंवा कर संबंधित कामे सहज ट्रॅक केली जातात आणि प्रक्रिया पारदर्शक होते.

बँक खात्याला पॅन लिंक करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर लॉग इन करून ‘Service’, ‘Service Request’ किंवा ‘Update PAN’ पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर पॅन नंबर, नोंदणीकृत ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि जन्मतारीख भरून सबमिट करावे. सबमिट केल्यानंतर(process) ही माहिती आयकर विभागाकडून पडताळली जाईल आणि सुमारे 7 दिवसांत लिंकिंग पूर्ण झाल्याची सूचना ईमेल किंवा एसएमएसद्वारे मिळेल.ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत, त्यांनी ही प्रक्रिया प्रत्येक खात्यासाठी स्वतंत्रपणे करणे आवश्यक आहे. तसेच, पॅन लिंक आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करता येईल किंवा बँकेच्या वेबसाइटवर तपासता येईल.
सरकारच्या या नियमामुळे आता नागरिकांनी लवकरात लवकर पॅन-लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात रिफंड अडकणे, व्यवहार न होणे किंवा वित्तीय सेवा रोखल्या जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :
खूप जुनी इच्छा पूर्ण होणार, आजचा दिवस अविस्मरणीय जाणार.. वाचा आजचं भविष्य
WhatsApp चे नवीन ‘About’ फीचर रोलआउट, यूजर्स शेअर करू शकतात रोजचे अपडेट्स
हातपाय सतत थंड पडत असतील तर, ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन बघा