UIDAI ने आधारशी संबंधित सुविधांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यासाठी आधार अॅपमध्ये (Aadhaar app)अत्याधुनिक Selective Share फीचर उपलब्ध करून दिले आहे. या सुविधेमुळे आता आधार कार्डवरील संपूर्ण माहिती शेअर करण्याची गरज राहणार नाही, तर गरजेनुसार फक्त निवडक माहितीच शेअर करता येणार आहे.

UIDAI ने तयार केलेले हे अधिकृत मोबाइल अॅप नागरिकांना आधारशी संबंधित सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देते. फेस लॉगिन, QR स्कॅनिंग आणि डिजिटल पडताळणीसह हे अॅप अधिक सुरक्षित बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या अॅपमध्ये स्वतःसोबतच कुटुंबातील सदस्यांचे आधार तपशीलदेखील ठेवता येतात, त्यामुळे फिजिकल कार्ड बाळगण्याची आवश्यकता राहत नाही.
सिलेक्टिव्ह शेअर फीचर विशेष मागणीत असून यामुळे(Aadhaar app) आधारवरील फोटो, नाव, वय, जन्मतारीख, लिंग, पत्ता, मोबाइल नंबर किंवा ईमेल — यापैकी कोणती माहिती शेअर करायची किंवा लपवायची हे वापरकर्त्याला ठरवता येते. त्यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता अधिक सुरक्षित होते.
हे फीचर कसे वापरावे?
आधार अॅप उघडा
Share ID वर क्लिक करा
उपलब्ध पर्यायांमधून Selective Share निवडा
शेअर करण्यासाठी आवश्यक माहिती निवडा
शेवटी Confirm & Share वर क्लिक करा
डिजिटल पडताळणी आणि दस्तऐवज शेअरिंग अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने UIDAI ने केलेला हा बदल नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

हेही वाचा :
60 वर्षाची गर्लफ्रेंड 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडकडे एकच मागणी करत होती…
पॅन आणि बँक खाते लिंक कसे करावे? ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या
कर्जदारांसाठी आनंदाची बातमी! तुमच्या कर्जाचा EMI कमी होणार?