पुणे जिल्ह्यातील चार प्रमुख तालुक्यांमध्ये जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरुरमध्ये मानव आणि बिबट्यांमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयामध्ये विशेष बैठक आयोजित केली(master) होती. पुण्यातील स्थानिक प्रतिनिधींसोबत या बैठकीमध्ये राज्याचे वनमंत्री गणेश नाईक सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये बिबट्यांच्या समस्येवर सरकारने एक रामबाण उपाय शोधला असून विशेष म्हणजे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गुजरातची आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींची अप्रत्यक्षपणे मदत घेतली जाणार आहे.

सकाळी साडेदहा वाजता मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये काही लोकप्रितिनिधी फोन कॉलवरुन उपस्थित होते. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत बिबटे पकडून केंद्रीय वनविभागाच्या परवानगीनं वनताराला पाठवण्यात येणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं(master). वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्या जेरबंद झाला आहे. याबद्दल बोलताना वनमंत्र्यांनी, “एक बिबट्या पकडला असून तोच नरभक्षक असू शकेल. त्याचे लगेच स्थलांतर केलं जाईल,” अशी माहिती दिली. “रागानं लोकांनी फॉरेस्ट जीप, कार्यालय जाळलं पण कारवाई करु नका असं आपण सांगितलं आहे,” अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली.
“बिबटे पकडण्यासाठी 200 पिंजरे लावण्यात येत आहेत. जंगलाशेजारील वाड्या, वस्त्या, गोठे हलवण्यात येणार आहेत,” असंही वनमंत्र्यांनी स्पष्ट केलं. “बिबट्यांचे हल्ले रात्री होतात. ऊसाला पाणी देण्याकरता दिवसा विजपुरवठ्याची व्यवस्था केली जाईल,” असं आश्वासनही वनमंत्र्यांनी दिलं आहे. “जिथे हल्ले झाले तिथे मी स्वत: भेट देणार आहे. जिथे ऊस उत्पादन होतं तिथे बिबट्यांना असरा मिळतो. ऊसतोड झाल्याववर बिबटे हल्ले करत आहेत,” असं वनमंत्र्यांनी वाढत्या हल्ल्यांमागील कारणांबद्दल बोलताना स्पष्ट केलं.
पुण्याचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी बिबट्या विषयावर बोलताना सविस्तर माहिती दिली. “स्थानिकांच्या 11 मागण्या या लेखी स्वरूपात देण्यात येणार आहे. त्यांच्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत. या भागात बिबट्याची संख्या वाढलेली आहे. सगळे बिबटे हे ऊसाच्या शेतात राहत आहेत. हे बिबटे जंगलात राहत नाहीत. जी संख्या वाढली आहे ती कंट्रोलमध्ये करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे,” अशी माहिती ठाकरे यांनी दिली.
“चार तालुक्यात 10 स्क्वेअर मध्ये साधारण 8 बिबटे असल्याचा रिपोर्ट आहे. प्रत्येक कुटुंबाला बिबट्या माहिती आहे त्यामुळे प्रत्येक जण बिबट्या पाहिला आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या घराजवळ बिबट्याचा वावर आहे, असं म्हणता येईल. प्रशासन सध्या आत्मपरीक्षण करत आहे शेतकऱ्याच्या वेदना प्रशासनाने समजून घेतल्या पाहिजे. त्या आम्ही वरिष्ठांना आणि मंत्री कळणार आहे. जर कोणी कर्मचारी चुकीचे काम करत असतील त्यांचा वर कारवाई करू. वन विभागाचे काम आहे की पिंजरा आणि भक्ष ठेवले पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्याने नम्र राहून काम केले पाहिजे.

सामान्य शेतकऱ्याच्या अडचणी स्वतःच्या समजून काम केले पाहिजे. कोणाबद्दल आरोप किंवा तक्रार असतील तर मला कळवावे त्याच्यावर शहानिशा करून कारवाई करण्यात येईल,” असं ठाकरेंनी सांगितलं. “बिबट्यांच्या हल्ल्याबाबत लवकरच हेल्पलाईन नंबर नागरिकांसाठी तयार करणार आणि प्रसिद्धी देण्यात येणार आहे. 242 पिंजरे आहेत ते सगळे लावले आहेत. अजून 200 पिंजरे ऑर्डर केले आहेत त्याला वेळ लागेल. अजून पिंजरे आपण वाढवणार आहोत. बिबट्या निवारण केंद्रात 42 बिबटे ठेवण्याची क्षमता आहे. या भागात रुग्णवाहिकेची संख्या वाढविण्यात येणार आहे,” अशी माहितीही ठाकरेंनी दिली.
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाचा पती जहीर इक्बालबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, लग्नाच्या अगोदरच त्याने…
संजय राऊत यांना ठाकरेंनी “राजकीय “आजारी पाडले?
पेट्रोल पंपापर ‘अशी’ होते फसवणूक, माहिती करुन घ्या तुमचा अधिकार!