कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

एखाद्या नियोजित जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहावयाचे नसेल तर, एखाद्याची भेट टाळावयाची असेल तर, राजकीय कार्यक्रमाकडे पाठ फिरवावयाची असेल तर, ठरलेले कार्यक्रम अचानक रद्द करावयाचे असतील तर, बहुतांशी राजकारणी हे आपण आजारी आहोत, डॉक्टरनी विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे असे कारण पुढे करतात. त्यांनी सांगितलेले कारण खरेही असू शकते किंवा असतेच. पण काही वेळा या राजकारण्यांचा(political) आजार”राजकीय”असतो. असे अनेक राजकीय आजार या महाराष्ट्राने यापूर्वीच्या राजकारणात पाहिलेले आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी स्वतःच आपण आजारी आहोत. त्यामुळे किमान दोन महिने आपण सक्रिय राजकारणापासून अलिप्त असणार आहोत असे जाहीर केले आहे. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त मोर्चाच्यानियोजनात ते सक्रिय होते.

हा मोर्चा दिनांक एक नोव्हेंबर रोजी मुंबईत निघेल. या मोर्चात मुंबईकर प्रचंड संख्येने सहभागी होतील. असे त्यांनी नेहमीप्रमाणे मीडियासमोर येऊन सांगितले होते. त्यामुळे या मोर्चात ते सहभागी असणार हे निश्चित होते. पण अचानक आधी एक दिवस संजय राऊत यांनी आपण आजारी आहोत. प्रकृती विषयक काही चाचण्या घ्यावयाच्या आहेत. डॉक्टरांनी किमान दोन महिने गर्दी पासून दूर राहा. लोकांशी संपर्क टाळा असा वैद्यकीय सल्ला दिला आहे. आणि त्यामुळे किमान दोन महिने मी आपणास अर्थात कार्यकर्त्यांना भेटू शकणार नाही. राजकीय(political) व्यासपीठावर दिसणार नाही. राजकीय कार्यक्रमात दिसणार नाही.आता आपली भेट नवीन वर्षातच होईल असे त्यांनी ट्विट करून आपल्या हंगामी राजकीय अज्ञातवासाबद्दल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. इसवी सन 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्याच्या हालचाली सुरू होत्या तेव्हा संजय राऊत हे आजारी पडले होते.

त्यांच्यावर एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण ते लगेच काही दिवसातच राजकारणात सक्रिय झाले होते. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा होत असताना संजय राऊत हे मात्र तेव्हा परदेशात गेले होते. आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आदि महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. या संदर्भात संजय राऊत यांनी स्वतःच राज ठाकरेंची भूमिका मीडियासमोर सांगितली होती. राज ठाकरे यांची भूमिका ते स्वतः कसे काय सांगू शकतात असा सवाल तेव्हा उपस्थित केला गेला होता. ठाणे महापालिका निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी स्वतःच जागा वाटपाचा फार्मूलाही जाहीर केला होता.” सत्याचा मोर्चा”च्या माध्यमातून ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत आहेत. हे सुद्धा संजय राऊत वारंवार सांगताना दिसत होते. पण अचानक मोर्चाच्या आधी एक दिवस संजय राऊत यांनी आपल्या आजाराविषयी जाहीर वाच्यता करून दोन महिने सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहणार आहोत हे स्पष्ट केल्यानंतर महाविकास आघाडीतील काही नेत्यांना आश्चर्य वाटले. काल पर्यंत जो माणूस सक्रिय होता, मोर्चाच्या नियोजनात व्यस्त होता तोच माणूस अचानक म्हणून आजारी पडतो याबद्दल आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे.


संजय राऊत हे खरेच आजारी असतील. त्यांच्या आजारी असल्याबद्दल शंका घ्यायचे कारणही नाही. पण ते आजारी आहेत असे दिसत नव्हते. आपल्या आजाराविषयी त्यांनी जाहीरपणे सांगितल्यानंतरही उद्धव ठाकरे तसेच ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही हे मात्र खटकते.सुप्रिया सुळे यांनी सुद्धा गुळमुळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्यांचा आजार हा राजकीय असल्याचेही बोलवले जाते. येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रात विशेषता मुंबईत राजकीय रणधुमाळी होणार आहे आणि त्यामध्ये संजय राऊत दिसणार नाहीत.गेल्या काही महिन्यांपासून संजय राऊत हे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी बद्दल बोलत असतात. राष्ट्रीय काँग्रेस बद्दलही ते प्रतिक्रिया देत असत. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीचे प्रवक्ते म्हणून डिवचले जात होते. महायुतीच्या काही नेत्यांच्याकडून त्यांना”सकाळचा भोंगा”म्हटले जायचे. त्यांच्यावर सातत्याने टीका टिपणी केली जायची.

संजय राऊत यांचे निवासस्थान हे वृत्तपत्रीय “बीट”बनले होते. मुंबईतील प्रसारमाध्यम प्रतिनिधींची रोजच्या कामाची सुरुवात संजय राऊत यांच्या बीट पासून व्हायची. आता संजय राऊत 2026 च्या जानेवारीपर्यंत तरी राजकारणापासून अलिप्त राहणार आहेत.ते प्रसार माध्यमांना प्रतिक्रियांसाठी उपलब्ध असणार नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी,आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, यांची मोठी अडचण होणार आहे. कारण संजय राऊत यांच्या प्रतिक्रियांवर हे मंडळी आपली प्रतिक्रिया देत होती किंवा त्यांच्यावर पलटवार करत होती.

पण आता किमान दोन महिने तरीमीडिया समोरील राजकारण्यांच्या उकाळ्या पाकळ्या थांबणार आहेत.निवडणुकांच्या रणधुमाळीत संजय राऊत असणार नाहीत हे मीडियाला सुद्धा चुकल्यासारखे वाटणार आहे.विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत यांच्या प्रकृती बद्दल भाष्य केले आहे. म्हणजे त्यांच्या (political)या आजाराची दखल दिल्लीने घेतलेली आहे. तेखरोखरीच आजारी आहेत का, की त्यांना दोन महिन्यांसाठी राजकारणापासून दूर राहा असा आदेश कुणीतरी दिला आहे, त्यांचा आजार राजकीय आहे याबद्दल राजकीय विश्लेषक येत्या काही दिवसात बोलतील.

हेही वाचा :

पेट्रोल पंपापर ‘अशी’ होते फसवणूक, माहिती करुन घ्या तुमचा अधिकार!

फेम अभिनेत्यानं प्राजक्ता माळीला केलेलं प्रपोज? म्हणाला, ‘मी सतत तिला…’

‘या’ अभिनेत्याने दारुच्या नशेत Tabu सोबत केली होती जबरदस्ती…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *