पेट्रोल(petrol) पंपावर 100 ऐवजी 99 रुपये किंवा 500 ऐवजी 495 रुपये भरून फसवणूक टाळता येते, असा समज चुकीचा आहे. खरे घोटाळे वेगळ्या पद्धतीने होतात. 99 रुपयांची पद्धत फक्त मनाला आनंद देणारी असते पण प्रत्यक्षात इंधन कमी मिळण्याची शक्यता कायम राहते. तेल कंपन्यांच्या नियमांनुसार, ग्राहकांना काही अधिकार देण्यात आलेयत. त्याबद्दल जाणून घेऊया.इंधन भरायला सुरुवात होण्यापूर्वी डिस्प्लेवर 0.00 रुपये आणि ०.०० लिटर दिसले पाहिजे. मीटर रीसेट नसेल तर कर्मचारी जुन्या रीडिंगवर भरू शकतो. ‘ऑटो कट’ किंवा ‘प्रिसेट’ मोडमध्ये सावध राहा.

लिटरनुसार भरणे अधिक सुरक्षित. उदा. 5 लिटर पेट्रोल मागा. प्रति लिटर दर × लिटर = एकूण रक्कम स्वतः मोजा. रुपयांमध्ये भरल्यास कर्मचारी वेग कमी-जास्त करून कमी इंधन देऊ शकतो.पेट्रोलची घनता 730 ते 770 kg/m³ असावी. प्रत्येक पंपावर हायड्रोमीटर असतो. ml ग्लास ट्यूब मागा, त्यात इंधन भरून घनता तपासाभेसळ असल्यास घनता कमी-ज्यादा दिसेल. हा ग्राहकाचा कायदेशीर हक्क आहे.
टाकी उघडून डिप रॉड/स्केल मागा. इंधन(petrol) पातळी हाताने मोजून तपासा. टाकीतील जुन्या इंधनाची पातळी + भरलेले लिटर = नवीन पातळी, हे गणित जुळले पाहिजे. नकार देऊ शकत नाहीत.भरताना स्क्रीनचा फोटो घ्या – यात रुपये, लिटर, प्रति लिटर दर, पंप क्रमांक, तारीख-वेळ दिसला पाहिजे. पुरावा म्हणून उपयुक्त. भरल्यानंतर बिल घ्या, त्यावरही ही माहिती असते.सामान्य वेग 30-40 लिटर/मिनिट. खूप हळू किंवा खूप जलद भरल्यास फसवणुकीची शक्यता. फोम जास्त येत असल्यास हवेचा भरणा होतो, इंधन कमी मिळते.

पंपावर वजन-मापन खात्याची सील असावी. कॅलिब्रेशन तारीख 6 महिन्यांपेक्षा जास्त जुनी नसावी. सील तुटलेली किंवा तारीख संपलेली असल्यास तक्रार करा.फसवणूक आढळल्यास पंप (petrol)मालक, तेल कंपनी हेल्पलाइन (BPCL: 1800222727, IOCL: 18002335744, HPCL: 18002334747 किंवा वजन-मापन विभाग यांच्याकडे तक्रार नोंदवा. बिल, फोटो, व्हिडिओ पुरावा म्हणून द्या. 10000 पर्यंत दंड किंवा परवाना रद्द होऊ शकतो. दररोज 10 पैसेही फसवले तर वर्षाला 1650 रुपये नुकसान! लिटरमध्ये भरा, घनता तपासा, पुरावा ठेवा – फसवणूक 100% थांबेल.
हेही वाचा :
फेम अभिनेत्यानं प्राजक्ता माळीला केलेलं प्रपोज? म्हणाला, ‘मी सतत तिला…’
‘या’ अभिनेत्याने दारुच्या नशेत Tabu सोबत केली होती जबरदस्ती…
प्रसिद्ध वकीलावर मोठी कारवाई; वकिलीची सनद रद्द