बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल (husband)यांच्या लग्नानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक अफवा रंगल्या. काही दिवसांपूर्वी सोनाक्षी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र अभिनेत्रीने या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. अलीकडेच ती कॉमेडियन भारती सिंहच्या शोमध्ये सहभागी झाली होती, जिथे तिने पहिल्यांदाच आपल्या सासरच्या कुटुंबाबद्दल मनमोकळेपणाने बोलत अनेक खुलासे केले.सोनाक्षीने सांगितले की, “आम्ही सगळे मिळून एकत्र सुट्ट्या घालवतो आणि खूप मजा करतो. लग्नाआधी जहीरने मला विचारले होते की तुला वेगळं राहायचं आहे का? पण मी त्याला स्पष्ट सांगितलं – ‘मी तुझ्या कुटुंबासोबतच राहणार, तुला वेगळं राहायचं असेल तर तू राहा.’”

स्वयंपाकाबद्दल बोलताना सोनाक्षीने मजेशीरपणे सांगितले, “मी अजिबातच जेवण बनवत नाही. माझ्या आईला कायम चिंता असायची की मला स्वयंपाक करता येत नाही. पण गंमत म्हणजे माझ्या सासूबाईंनाही स्वयंपाक करता येत नाही. त्या कायम मला म्हणतात की, ‘तू बरोबर घरात आलीस!’ मला खाण्याची प्रचंड आवड आहे पण स्वयंपाक करण्याची नाही.”सोनाक्षीने पुढे सांगितले की, लग्नानंतर ती जहीर इक्बालच्या(husband) कुटुंबासोबतच राहते आणि त्यांच्या घरात खूप प्रेमळ आणि आपुलकीचं वातावरण आहे. “त्यांचं घर खूप पॉझिटिव्ह आहे, सगळे एकमेकांची काळजी घेतात. मला कधीच असं वाटलं नाही की मी नवीन घरात आलेय,” असं ती म्हणाली.

सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट सलमान खानच्या घरी झाली होती आणि त्याच क्षणी दोघांमध्ये चांगली ओळख निर्माण झाली. पुढे ही ओळख प्रेमात बदलली आणि शेवटी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. आता लग्नानंतर सोनाक्षी पहिल्यांदाच आपल्या सासरच्या जीवनाबद्दल इतक्या मोकळेपणाने बोलल्याने तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि कौतुकाचं वातावरण दिसत आहे.
हेही वाचा :
संजय राऊत यांना ठाकरेंनी “राजकीय “आजारी पाडले?
पेट्रोल पंपापर ‘अशी’ होते फसवणूक, माहिती करुन घ्या तुमचा अधिकार!
फेम अभिनेत्यानं प्राजक्ता माळीला केलेलं प्रपोज? म्हणाला, ‘मी सतत तिला…’