कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सोबत एक मोठा करार केला आहे. या भागीदारीमुळे ईपीएफओ पेन्शनधारकांना(pensioners) त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र घरबसल्या मिळवणे शक्य होणार आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे.या नवीन सुविधेसाठी, आयपीपीबी आपले विशाल नेटवर्क वापरणार आहे. देशभरातील १.६५ लाख पोस्ट ऑफिस आणि ३ लाखाहून अधिक डोरस्टेप बँकिंग कर्मचारीपेन्शनधारकांना ही सेवा पुरवतील. पेन्शनधारकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी आयपीपीबी ॲप वापरता येईल किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधता येईल.

पेन्शनधारकाने विनंती केल्यानंतर, पोस्टमन किंवा कर्मचारी मोबाईल डिव्हाइस घेऊन त्यांच्या घरी येतील. तिथे पेन्शनधारकाचे फेस ऑथेंटिकेशन किंवा फिंगरप्रिंट वापरून बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल. हे प्रमाणपत्र थेट ईपीएफओला पाठवले जाईल, ज्यामुळे पेन्शन अखंडितपणे सुरू राहील. यामुळे कागदी(pensioners) प्रमाणपत्रांची गरज संपुष्टात येईल.ही महत्त्वपूर्ण भागीदारी ईपीएफओच्या ७३ व्या स्थापना दिनी दिल्ली येथे जाहीर करण्यात आली. यावेळी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयपीपीबीचे एमडी आर. विश्वेश्वरन आणि ईपीएफओ आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

ही सेवा १९९५ च्या कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांसाठी आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते, अन्यथा पेन्शन थांबवली जाते. आता ही धावपळ थांबणार असून, विशेषतः ग्रामीण आणि निम-शहरी भागातील वृद्धांना याचा सर्वाधिक फायदा होईल. ही भागीदारी ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला बळ देईल.
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाचा पती जहीर इक्बालबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, लग्नाच्या अगोदरच त्याने…
संजय राऊत यांना ठाकरेंनी “राजकीय “आजारी पाडले?
पेट्रोल पंपापर ‘अशी’ होते फसवणूक, माहिती करुन घ्या तुमचा अधिकार!