ड्रॅगन फ्रूट (fruit)हे आजच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय आणि आरोग्यदायी फळांपैकी एक मानले जाते. आकर्षक दिसणारे हे फळ केवळ चविष्टच नाही, तर अत्यंत पौष्टिक देखील आहे. यात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C, नैसर्गिक फायबर आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.विशेष म्हणजे, ड्रॅगन फ्रूट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं. नियमित सेवन केल्यास सर्दी, ताप, आणि विविध संसर्गजन्य आजारांपासून शरीराचे नैसर्गिक संरक्षण होते. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी हे फळ खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, तसेच पचनक्रिया सुधारते.

यातील नैसर्गिक फायबर पोटाशी संबंधित तक्रारी कमी करतं आणि शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो. आठवड्यात किमान एकदा हे फळ खाल्ल्यास हृदय निरोगी राहते.वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांसाठीही हे फळ वरदान ठरू शकते. कारण ड्रॅगन फ्रूट (fruit)भूक नियंत्रित ठेवतं आणि शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवतो. यामुळे वजन नैसर्गिकरीत्या कमी होण्यास मदत होते.
डेंग्यू, मलेरिया आणि कावीळ यांसारख्या आजारांवर देखील हे फळ उपयुक्त मानले जाते. यात असलेले व्हिटॅमिन्स आणि खनिजे रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढवतात, ज्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. त्वचेसाठी देखील ड्रॅगन फ्रूट अत्यंत फायदेशीर आहे. यातील व्हिटॅमिन C त्वचेला नैसर्गिक चमक देतं आणि निस्तेजपणा दूर करतो. त्यामुळे नियमितपणे ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यास शरीर तंदुरुस्त, त्वचा उजळ आणि मन प्रसन्न राहते.

हेही वाचा :
तुमच्या फोनमध्ये दडलंय सोनं! अनेकांना ठाऊक नाही याची जागा…
 शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे राजकीय निवृत्तीचे संकेत…
पती-पत्नी आणि ती! सरकारी निवासस्थानी CO साहेबांचे लफडे, घटनास्थळी पत्नीची थेट एन्ट्री अन् व्हिडिओ व्हायरल…