दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं भूक लागते. नाश्त्यात(breakfast) शेवपुरी, भजीपाव, पाणीपुरी, वडापाव इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच नाश्त्यात तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट कुरकुरीत स्प्रिंग रोल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळ्या भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेले स्प्रिंग रोल चवीला अतिशय सुंदर लागतात. संध्याकाळच्या नाश्त्यात कायमच बाहेरील पदार्थांचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडणे, ऍसिडिटी, अपचन, उलट्या इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे नाश्त्यात कायमच घरी बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया स्प्रिंग रोल बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:
तेल
आलं लसूण
मैदा
गाजर
कोबी
शिमला मिरची
हिरवी मिरची
सोया सॉस
चिली सॉस
व्हिनेगर
शेजवान चटणी
स्प्रिंग रोल शीट्स
कांदा
मीठ
चिली फ्लेक्स
दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा पालक सांबार, तुपाच्या फोडणीमुळे चव लागेल सुंदर
कृती:
स्प्रिंग रोल बनवण्यासाठी सगळ्यात आधी सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. भाज्या तुम्ही मिक्सरमधून जाड बारीक सुद्धा वाटून घेऊ शकता.कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेलं आलं, लसूण घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून लाल होईपर्यंत भाजा.त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घालून हलक्याशा शिजवा. भाज्यांना कुरकुरीत करा.
भाज्यांना वाफ आल्यानंतर त्यात सोया सॉस, व्हिनेगर, मीठ आणि काळीमिरी पावडर घालून मिक्स करा. सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात शेजवान चटणी घालून मिक्स करून घ्या.स्प्रिंग रोलच्या शीट घेऊन त्यात तयार केलेले मिश्रण भरून दोन्ही बाजूने व्यवस्थित पॅक करून घ्या. कढईमधील गरम तेलात तयार केलेले स्प्रिंग रोल(breakfast) दोन्ही बाजूने तळून घ्या.तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कुरकुरीत स्प्रिंग रोल. हा पदार्थ शेजवान चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

हेही वाचा :
हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा, 10 जिल्ह्यांना हाय अलर्ट
किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष
संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली, उपचारासाठी रूग्णालयात दाखल