पती-पत्नीमध्ये वाद होणे ही साधारण गोष्ट असली तरी कधी कधी या वादाचं रुप किती भयंकर होऊ शकतं हे सांगणं कठीण असतं. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पतीच्या बेरोजगारीला कंटाळून त्याची वीट आणि दांडक्याने हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, पतीचा खून(murder) केल्यानंतर ती त्याच्या मृतदेहाशेजारी बसून मेकअप करत होती. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील गोहाना परिसरात ही भीषण घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच नाव सुरेश (६० वर्षे) असे आहे. सुरेश हा ऑटोरिक्षा चालवत होता. मात्र आजारपणामुळे त्याने काम बंद केले. यामुळे त्याची पत्नी पूनम नाराज होती. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,पती- पत्नीमध्ये नियमित भांडण होत होत. पत्नी पतीला मारहाण करीत होती. ज्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
ज्या दिवशी पूनमने हत्या केली त्या दिवशी सकाळी पूनम आणि सुरेशमध्ये खूप वाद झाला होता. त्यानंतर पूनमने पातीला वीट आणि दांडक्याने मारहाण केली आणि यात सुरेशचा जागीच मृत्यू (murder)झाला. यानंतर पुनमचं वागणं भयंकर होतं. तिने पतीच्या मृतदेहाशेजारील खाट लावली आणि त्यावर बसून केस विंचरू लागली.फणीने पतीच्या तोंडावर मारलं आणि मृत पतीच्या कानशिलात लगावली. शेजारच्या लोकांनी जेव्हा हे सगळ पाहिलं तेव्हा ते हादरले.
हा प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सुरेशचा मृतदेह ताब्यात घेतले आणि त्यांनी पतीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आरोपी पूनम हिला अटक करण्यात आली आहे. तिचा तपास सुरु आहे. महिलेला मानसिक आजार होता. याबाबतची तपास केला जात आहे.

हेही वाचा :
Apple Watch झाली आणखी स्मार्ट! WhatsApp चॅटिंग करण्यासाठी iPhone ची आवश्यकता संपली
ऐश्वर्या रायचा मोठा गौप्यस्फोट! अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर केला खुलासा
मेसेजिंग प्लॅटफॉर्मने युजर्सना दिलं मोठं गिफ्ट! आता नंबरशिवायही करता येणार कॉल