बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे चित्रपट आणि खासगी आयुष्य दोन्ही कायम चर्चेत असतात. चाहत्यांना तिच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. अलीकडेच ऐश्वर्याने दिलेल्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती आपल्या सासऱ्यांबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना दिसते.2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत विवाहबंधनात अडकलेल्या ऐश्वर्या रायने अनेक वर्षे आनंदी संसार घालवला. मात्र, काही महिन्यांपासून त्यांच्या नात्याबद्दल(relationship) विभक्ततेच्या चर्चेला उधाण आले आहे. या चर्चांवर ना ऐश्वर्या, ना अभिषेक आणि ना बच्चन कुटुंबातील कोणीही भाष्य करताना दिसले. त्यामुळे चाहत्यांमध्ये कुतूहल अधिक वाढले आहे.

एका मुलाखतीत ऐश्वर्या रायला विचारण्यात आले की, “प्रसिद्ध अभिनेते आणि तुझे सासरे अमिताभ बच्चन यांच्याशी तुझे नाते नेमके कसे आहे?” यावर ऐश्वर्याने अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “मी त्यांचा खूप आदर करते. ते माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. ज्या पद्धतीने मला स्वीकारले आणि प्रेम दिले, त्याबद्दल मी सदैव आभारी आहे.”या वक्तव्याने चाहत्यांनी बच्चन कुटुंबातील नातेसंबंधांबद्दल असलेल्या अनेक अफवांना उत्तर मिळाल्याचे म्हटले आहे. ऐश्वर्याने आपल्या सासऱ्यांचा उल्लेख करताना सन्मान आणि आत्मीयता या दोन्ही भावना व्यक्त केल्या.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलत नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र फार क्वचित दिसतात. अभिषेकला काही दिवसांपूर्वी करिअरमधील पहिला “बेस्ट अॅक्टर अवॉर्ड” मिळाला, मात्र त्या समारंभाला ऐश्वर्या उपस्थित नव्हती. तरीही, अभिषेकने आपल्या भाषणात ऐश्वर्याचे नाव घेत कृतज्ञता व्यक्त केली होती.ऐश्वर्या राय बच्चन ही काही वर्षांपूर्वी अनंत अंबानीच्या लग्नसमारंभात बच्चन कुटुंबासोबत दिसली होती. तिच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यात नेहमीच आपुलकी आणि आदराची (relationship)भावना दिसून येते. “अमिताभ सर माझ्यावर एका मुलीसारखं प्रेम करतात,” असं ऐश्वर्याने आणखी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

हेही वाचा :
इचलकरंजीत जनतेचा सवाल — “महापालिकेचे अधिकारी एक दिवस तरी आलिशान गाड्या सोडून दोन चाकीवर फिरून दाखवावेत!”
आजची त्रिपुरारी पौर्णिमा ‘या’ राशींसाठी भाग्यशाली
कांदा न खाल्ल्याने होतात ‘हे’ गंभीर आजार?