कन्नड आणि तेलुगू मालिकांमध्ये काम करणाऱ्या ४१ वर्षीय अभिनेत्रीला सोशल मीडियावर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या छळामुळे त्रस्त झालेल्या अभिनेत्रीने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपीची ओळख (private)नवीन के. मोन अशी झाली असून, तो एका आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान भरती कंपनीत डिलिव्हरी मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नवीनने सर्वप्रथम अभिनेत्रीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. मात्र अभिनेत्रीने ती रिक्वेस्ट स्वीकारली नाही. त्यानंतर नवीनने दररोज मेसेंजरवरून तिला आक्षेपार्ह मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. अभिनेत्रीने त्याला ब्लॉक केल्यानंतरही तो थांबला नाही, उलट त्याने अनेक बनावट खाती तयार करून तिला अश्लील व्हिडिओ आणि खाजगी अवयवांचे क्लिप्स पाठवले.
१ नोव्हेंबर रोजी अभिनेत्रीने या प्रकरणाचा शेवट करण्यासाठी नवीनला बेंगळुरूच्या नगरभावी सेकंड स्टेजमधील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. तेथे अभिनेत्रीने त्याला अशा कृती थांबवण्याचा इशारा दिला, पण त्याने काहीही ऐकले नाही. शेवटी अभिनेत्रीने धैर्य एकवटून पोलिसांत तक्रार दाखल केली.पोलिसांनी तातडीने कारवाई करत नवीनला अटक केली आणि त्याच्यावर लैंगिक छळ आणि सायबर गुन्ह्यांअंतर्गत गुन्हा दाखल केला. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील महिलांच्या(private)सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे. अभिनेत्रीनेही इतर महिलांना संदेश दिला आहे की, “अशा प्रकारच्या छळाला बळी न पडता त्वरित पोलिसांचा संपर्क साधा. मौन धरणं म्हणजे गुन्हेगाराला प्रोत्साहन देणं आहे.”
हेही वाचा :
पेन्शनर्सना मोठा दिलासा! EPFO ने घेतला महत्त्वाचा निर्णय…
फडणवीस सरकारचा मास्टर प्लॅन….
सोनाक्षी सिन्हाचा पती जहीर इक्बालबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, लग्नाच्या अगोदरच त्याने…