जर तुम्ही WhatsApp युजर्स असाल आणि Apple चे स्मार्टवॉच वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. WhatsApp ने अखेर Apple Watch साठी त्यांचे डेडिकेटेड अ‍ॅप लाँच केले आहे. हे नवीन अ‍ॅप Apple Watch साठी लाँच करण्यात आले आहे. या नवीन अ‍ॅपमुळे आता युजर्स आयफोनशिवाय त्यांच्या स्मार्टवॉचमधून चॅटिंग करू शकणार आहेत. हे नवीन अ‍ॅप केवळ नोटिफिकेशनपुरते मर्यादित (Watch)नाही. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन अ‍ॅपमध्ये अनेक फीचर्स जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता हा अ‍ॅप वापरताना युजर्सना आणखी मजा येणार आहे.

खरं तर, युजर्स बऱ्याच काळापासून या अ‍ॅपची मागणी करत होते. आता अखेर हे अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. याशिवाय, कंपनीने सांगितलं आहे की, पर्सनल मेसेज आणि कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार आहे. याचा अर्थ असा आहे की, संभाषणाबाहेरील कोणीही, अगदी WhatsApp किंवा Meta देखील, तुमचे संभाषण ऐकू किंवा वाचू शकत नाही. कंपनीचं असं म्हणणं आहे की, ही केवळ सुरुवात आहे आणि भविष्यात Apple Watch यूजर्ससाठी आणखी नवीन फीचर्स रोलआऊट केले जाणार आहेत. Apple वॉचसाठी जारी केलेल्या या व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपमध्ये कोणते फीचर्स उपलब्ध आहेत ते प्रथम जाणून घेऊया.

व्हॉट्सअ‍ॅप Apple Watch अ‍ॅपचे फीचर्स जाणून घ्या

कॉल नोटिफिकेशन: आता तुम्ही Apple Watch वर कोणी तुम्हाला कॉल केला आहे, हे देखील पाहू शकणार आहेत.

फुल मेसेज व्यू: एवढेच नाही तर आता तुम्ही Apple Watch वरच मोठे मेसेज पूर्णपणे वाचू शकाल.

व्हॉईस मेसेज: या नवीन अ‍ॅपमुळे आता युजर्स त्यांच्या (Watch)मनगटावरून व्हॉईस मेसेज रेकॉर्ड आणि सेंड करू शकणार आहात.

इमोजी रिअ‍ॅक्शन: मेसेजवर तुम्ही अ‍ॅपमधूनच ईमोजीने रिअ‍ॅक्ट करू शकणार आहात.

मीडिया सपोर्ट: वॉचवर साफ इमेजेज आणि स्टिकर्स देखील पाहायला मिळणार आहे.

कंपनीचं असं म्हणणं आहे की, नवीन अ‍ॅप Apple Watch Series 4 किंवा त्यापेक्षा नवीन मॉडेलवर चालणार आहे किंवा watchOS 10 किंवा त्यापेक्षा नवीन मॉडेलवर चालणार आहे. जर तुमचे वॉच तुमच्या आयफोनशी जोडलेले असेल आणि ऑटो डाउनलोड चालू असेल, तर अ‍ॅप आपोआप इंस्टॉल होईल. अन्यथा, तुम्ही ते तुमच्या आयफोनच्या वॉच अ‍ॅपवरून मॅन्युअली डाउनलोड करू शकता.

हेही वाचा :

ऐश्वर्या रायचा मोठा गौप्यस्फोट! अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर केला खुलासा

मेसेजिंग प्लॅटफॉर्मने युजर्सना दिलं मोठं गिफ्ट! आता नंबरशिवायही करता येणार कॉल

इचलकरंजीत पुरवठा कार्यालयात आग…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *