WhatsApp गेल्या काही काळापासून मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर्स(features) घेऊन येत आहेत. युजर्सना अधिक चांगला अनुभव मिळावा आणि मेसेजिंगमध्ये कोणतीही समस्या येऊ नये, यासाठी कंपनी अॅपमध्ये सतत नवीन फीचर्सचा समावेश करत आहे. अलीकडेच कंपनीने WhatsApp च्या इंटरफेसमध्ये देखील बदल केला आहे आणि तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की, लवकरच आयफोनमध्ये WhatsApp वर लिक्विड ग्लास डिझाईन पाहायला मिळू शकते. तसेच कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर यूजरनेमसाठी सपोर्ट जोडण्याचा देखील प्रयत्न करत आहे.

आता या युजरनेम फीचरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता असं सांगितलं जात आहे की, युजर्स आता लवकरच यूजरनेम सर्च करून देखील कोणत्याही व्यक्तीला कॉल करू शकणार आहेत. त्यामुळे आता युजर्सना मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर नंबर शेअर करण्याची गरज लागणार नाही. आता नंबरशिवाय देखील युजर्स एकमेकांना कॉल करू शकणार आहेत. असं सांगितलं जात आहे की, युजर्स (features)नंबरशिवाय दुसऱ्या युजर्सना टेक्स्ट आणि कॉल करू शकणार आहेत. ही फंक्शनॅलिटी आधीपासूनच Signal अॅपवर उपलब्ध आहे. आता हे फीचर WhatsApp वर देखील येणार आहे.
खरंतर अलीकडेच iOS आणि Android साठी WhatsApp च्या बीटा रिलीजमध्ये फीचर ट्रॅकर WABetaInfo ने एक असा कोड शोधणार आहे, जो मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर यूजर्सना सर्च करण्यासाठी आणि कॉल करण्यासाठी एक नवी पद्धतीची माहिती देणार आहे. या फीचरबाबत असं सांगितलं जात आहे की, WhatsApp लवकरच एक फीचर घेऊन येणार आहे, ज्यामध्ये युजर्स कोणत्याही व्यक्तीचे युजरनेम सर्च करून त्याला कॉल करू शकणार आहेत. म्हणजेच आता WhatsApp वर कॉल करण्यासाठी फोन नंबरची गरज नसेल. तथापी सध्या या फीचरची (features)चाचणी केली जात आहे. ज्याचा अर्थ असा आहे की, युजर्ससाठी अद्याप हे फीचर रोलआऊट करण्यात आलं नाही. तुम्ही बीटा टेस्टर किंवा तुमच्याकडे लेटेस्ट टेस्टिंग वर्जन असेल तरी देखील अजूनही हे फीचर तुमच्यासाठी रिलीज करण्यात आलं नाही.

WABetaInfo ने त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, मेसेजिंग प्लॅटफॉर्म शेवटी यूजर्सना WhatsApp वर कॉल्स टॅबमध्ये सर्च बारद्वारे कोणत्याही व्यक्तीचे युजरनेम सर्च करण्याचा पर्याय देणार आहे. तुम्ही व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल करू शकाल. तुमच्या गोपनीयता सेटिंग्जनुसार, कॉलर ज्या व्यक्तीला कॉल करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा प्रोफाईल फोटो देखील पाहू शकतो.
हेही वाचा :
इचलकरंजीत जनतेचा सवाल — “महापालिकेचे अधिकारी एक दिवस तरी आलिशान गाड्या सोडून दोन चाकीवर फिरून दाखवावेत!”
आजची त्रिपुरारी पौर्णिमा ‘या’ राशींसाठी भाग्यशाली
कांदा न खाल्ल्याने होतात ‘हे’ गंभीर आजार?