सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिल्ली एनसीआर भागातील सर्व भटक्या कुत्र्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावं असा आदेश दिला आहे. तसंच भटक्या कुत्र्यांच्या(dogs) चावण्याच्या समस्येने उग्र रुप धारण केल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली महापालिकेने आतापर्यंत 100 भटक्या कुत्र्यांना ताब्यात घेतलं आहे. शहरातील प्राणी जन्म नियंत्रण केंद्रांचे आश्रयस्थानात रुपांतर केलं असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. कोर्टाच्या निर्णयावर अनेक राजकीय नेते, सेलेब्रिटींनी नाराजी जाहीर केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मतं मांडली आहेत. मराठी गायिका, अभिनेत्री केतकी माटेगावकरनेही यावर मत मांडलं असून, तिला अश्रू अनावर झाले आहेत.

केतकी माटेगावकरने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणत आहे की, “एक डॉग मदर नात्याने मला प्रामाणिकपणे वाटत आहे की, जे काही सुरू आहे ते अत्यंत क्रूर आहे. काहीजण माझ्याशी असहमत असतील, तुम्हाला त्याचं स्वातंत्र्य आहे. पण, सध्या जे व्हिडीओ समोर येत आहेत आणि ज्या पद्धतीने कुत्र्यांना (dogs)पकडून ट्रकमध्ये फेकलं जात आहे, अशाप्रकारे जेव्हा माणसांसोबत केलं जाईल ना तेव्हा कळेल. जसं एकेकाळी हिटलरने सर्वांना त्रास दिला होता त्याप्रकारे माणसांना वागणूक दिली ना? मग समजेल. तुम्ही म्हणताय की आम्ही लसीकरण करू, सर्व सुविधा द्याल त्या आधी दाखवा”.

“कोणताही निर्णय अचानक घेऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतं, कुत्र्यांच्या अंगावर भरपूर केस असतात कारण ते सतत बाहेरच्या वातावरणारणातून संरक्षण मिळवण्यासाठी असतात. आपण कुत्र्यांना आपल्यासाठी घरात आणतो. माझ्याकडे सुद्धा कुत्रा आहे. मी श्वानप्रेमी असल्याने त्याला घरी आणलं. पण, त्याला सतत बाहेर जायचं असतं. तो जेव्हा इतर श्वानांना भेटतो तेव्हा प्रचंड खूश होतो. मला मान्य आहे की, रेबिजसारखे आजार आणि सुरक्षा म्हणून हा निर्णय घेतला असेल पण, या गोष्टीला काहीतरी बॅलन्स असला पाहिजे,” असं मत तिने मांडलं आहे.

“एवढ्या सगळ्या श्वानांना पकडून तुम्ही सेफ शेल्टर होममध्ये ठेवणार आहात ना? मग ते शेल्टर कुठे आहे? आम्हाला ते बघायला मिळेल का? जिथे मोकळी आणि सुंदर जागा असावी,, फक्त बंदिस्त राहणार नाही, असा कोणता मार्ग आहे का? त्यांची काळजी घेण्यासाठी तिथे चांगली माणसं असणार आहेत का?. आतापर्यंत समोर आलेलं जे काही फुटेज मी पाहतेय. ज्या पद्धतीने या भटक्या कुत्र्यांना नेलं जातं आहे, तांदूळ, गव्हाप्रमाणे त्यांना पोत्यात वगैरे बांधून झटकलं जातं. असं सगळं न करता त्यांच्याशी जरा प्रेमाने तरी वागा इतकंच माझं म्हणणं आहे,” असंही ती म्हणाली आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयात भटक्या कुत्र्यांसंबंधी याचिकेवर आपण स्वत: सुनावणी घेणार असल्याचं सरन्यायाधीस भूषण आर गवई यांनी सांगितलं आहे. मानवी हक्क परिषदेकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरी निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा :

15 ऑगस्टच्या मांसविक्री बंदीवरुन राज ठाकरे संतापले…

मध्यरात्री मुलीचा मृत्यू, कुटुंबियांनी पहाटे परस्परच उरकला अंत्यविधी

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 10 जणांचा मृत्यू…. 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *