कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेबरोबरच राज्यातील आठ महानगरपालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर(meat sales) बंदी घातली आहे. या मुद्द्यावरुन वादाला तोंड फुटलेलं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयाला विरोध केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरेंना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी माझ्या लोकांना मी ते काही नाही सगळं चालू ठेवा असं सांगितलंचं नमूद केलं. एवढ्यावरच न थांबता राज यांनी कोणी काय खावं काय नाही हे सांगण्याचा अधिकार सरकारला नसल्याचंही म्हटलं आहे. राज ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये आपला आक्षेप नोंदवला.

“मी आमच्या लोकांना सांगितलं आहे ते चालू ठेवा म्हणून,” असं राज कल्याण-डोंबिवलीतील 15 ऑगस्टच्या मांसविक्री(meat sales) बंदीवर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं. “महापालिकेला याचे अधिकार नाहीत. कोणी काय खावं आणि काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकेने करु नयेत. म्हणजे एकाबाजूने स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही. मला असं वाटतं की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय हाच विरोधाभास आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.”म्हणजे आपण दोन गोष्टी पाळतो स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन. प्रजेची सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतोय.

मग तुम्ही बंदी कशी आणताय? कोणाचे काय धर्म आहेत आणि सण आहेत. त्यानुसार कोणी काय खावं हे सरकारने सांगू नये. कोणत्याच सरकारने सांगू नये कोणी काय खाल्लं पाहिजे आणि काय खावू नये,” असं स्पष्ट मत राज यांनी मांडलं.”मी आताच कोणाकडून तरी ऐकलं हा 1988 साली हा कायदा आणलाय. तो 1988 साली आणला असेल नाहीतर आता आणला असेल कोणत्याही सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्यदिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरवून घेतो हा कोणता स्वातंत्र्य दिन?” असा सवाल राज यांनी केला.
राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना कल्याण-डोंबिवलीतील मांसविक्री बंदीच्या निर्णयाला न जुमानता सर्वकाही चालू ठेवण्यास सांगितले आहे.राज ठाकरेंनी म्हटले की, एकीकडे स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो, पण दुसरीकडे खाण्याचे स्वातंत्र्य हिरावले जाते. स्वातंत्र्यदिनी कोणत्याही प्रकारची बंदी आणणे हा विरोधाभास आहे, असे त्यांनी नमूद केले.राज ठाकरेंनी सवाल केला, “स्वातंत्र्यदिनी लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतो, हा कोणता स्वातंत्र्यदिन?” त्यांनी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे प्रजेच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असताना अशा बंद्या आणणे चुकीचे असल्याचे म्हटले.
हेही वाचा :
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 10 जणांचा मृत्यू….
सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण….
या देशाने व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम कॉलवर बंदी घातली, गुन्हेगारी रोखण्याचे आवाहन