सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे आता खूप सोप्पे झाले आहे. म्युच्युअल फंडात इतर गुंतवणूक(Investing) पर्यायांच्या तुलनेत जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते, पण हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सर्व फंड्सने चांगला परतावा दिला असेल असे नाही. काही फंड्सने गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिल्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. SIP सुरू करण्यापूर्वी फंडची कामगिरी, अटी-शर्ती आणि भविष्यातील अंदाज तपासणे आवश्यक आहे.

जर गुंतवणूकदार दरमहा फक्त 500 रुपयांची SIP करत असेल, तर त्यातून मिळणारा परतावा फारसा मोठा होणार नाही. त्याऐवजी, दरमहा 2000 रुपयांची गुंतवणूक(Investing) करणे फायदेशीर ठरेल. योग्य रणनीती आणि आर्थिक शिस्त ठेवल्यास या रकमेपासूनही मोठा फंड तयार करता येतो. उदाहरणार्थ, 2000 रुपयांच्या मासिक SIP द्वारे 30 वर्षांनंतर 1.59 कोटी रुपयांचा फंड तयार होऊ शकतो. यासाठी गुंतवणूकदाराने एकही SIP न चुकवता सलग 30 वर्षे गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल.

अधिक फायदा घेण्यासाठी टॉप-अप SIP ही रणनीती वापरता येईल. यात प्रत्येक वर्षी मासिक SIP ची रक्कम 10% ने वाढवली जाते. जर 2000 रुपयांचा टॉप-अप SIP 30 वर्षांसाठी सुरु ठेवला, तर एकूण गुंतवणूक 39.47 लाख रुपये होईल आणि 30 वर्षांनंतर मिळणारा एकूण फंड 1.59 कोटी रुपये असेल. यात 1.20 कोटी रुपयांचा केवळ परतावा असून, चक्रवाढ व्याजाचा फायदा गुंतवणूकदाराला मिळेल. यामुळे बचतीवर व्याज आणि त्यावर पुन्हा व्याज हे चक्र अखंड सुरू राहते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीत मोठा फंड तयार होतो.

हेही वाचा :

BSNL युजर्सना महागाईचा मोठा झटका…

22 वेळा मॉडेलनं भाजपला…; राहुल गांधी यांचा गौप्यस्फोट

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाची गाडी ठरतेय प्रचार चर्चेतील विषय

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *