महाराष्ट्रासह(Maharashtra) देशातसुद्धा सध्या निवडणुकांची धामधूम असून इथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा असतानाच देशात चर्चेत आली आहे ती बिहार आणि हरियाणाची निवडणूक. याच धर्तीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतंच एक अधिकृत सादरीकरण करत त्या माध्यमातून काही खळबळजनक पुरावे जनतेसमोर आणत मतचोरीचा मुद्दा आणि कैक गुपितं उघड केली.

हरियाणात मतचोरी करूनच भाजपचं सरकार सत्तेवर आलं असा दावा राहुल गांधी यांनी केला. आपण बरीच पडताळणी केल्यानंतर महाराष्ट्र(Maharashtra), कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये मतचोरी झाल्याची वस्तुस्थिती त्यांनी सर्वांसमोर आणली. यादरम्यान त्यांनी एक Presentation सर्वांसमोर आणलं ज्यामध्ये छायाचित्रांसह काही खळबळजनक पुरावे मांडण्यात आले.

एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो आणि तिच्या नावाचा उल्लेख कर या महिलेच्या नावे 22 मतदार ओळखपत्र सापडली असून, कधी तिचं नाव सीमा, स्वीटी असून ही महिलाच मुळची भारताची नाही पण ती हरियाणाची मतदार मात्र आहे, असा चपखल टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा :

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाची गाडी ठरतेय प्रचार चर्चेतील विषय

निवडणुका जाहीर होताच अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

रेल्वे रुळ ओलांडताना समोरुन येणाऱ्या एक्स्प्रेसने उडवलं, प्रवाशांच्या मृतदेहाचे अक्षरश: तुकडे

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *