कोल्हापूर | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (elections)2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची कोल्हापूर जिल्हा पूर्व निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती आज भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांनी अधिकृतपणे जाहीर केली. पक्षाच्या आगामी निवडणूक रणनीतीसाठी ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

सुरेश हाळवणकर हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या संघटनात कार्यरत असून, त्यांच्या अनुभव, संघटन कौशल्य आणि जनसंपर्कातील निपुणतेमुळे पक्षात त्यांना भक्कम ओळख मिळाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप संघटनाला नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक स्तरावरील पदाधिकाऱ्यांमध्ये या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, “हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीत पक्ष नक्कीच उल्लेखनीय यश मिळवेल,” असा उत्साह व्यक्त होत आहे.
भाजप प्रदेश नेतृत्वाकडून मिळालेल्या या विश्वासाबद्दल हाळवणकर यांनी प्रदेशाध्यक्ष, पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले असून, “कोल्हापूर जिल्ह्याचा विकास आणि भाजपची वैचारिक ताकद वाढविणे हेच माझे प्रमुख ध्येय राहील,” असे ते म्हणाले.या नियुक्तीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या(elections) संघटनात नवचैतन्य संचारले असून, पक्षाच्या निवडणूक तयारीला अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :
आज गुरुवारचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा…
TATA कडून Team India च्या जगज्जेत्यांना खास भेट
नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी Spring Rolls