महाराष्ट्राला यंदा पावसाने जोरदार झोडपून टाकलं आहे. राज्यात मान्सून सरासरीपेक्षा अधिक पडल्यामुळे खरीप हंगामाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही मोठे झाले आहे. अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी पसरल्यामुळे शेती बुडाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली असतानाच भारतीय हवामान विभागाने(Department) राज्यात पुन्हा पावसाचा इशारा दिल्यामुळे चिंता वाढली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तीन ते चार दिवस मराठवाडा, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड; मराठवाड्यातील धाराशिव, लातूर; तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये या पावसाचा धोका अधिक आहे.
पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे, मात्र त्यानंतर हळूहळू तापमान कमी होऊन गारठा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना (Department)सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. यामुळे रब्बी हंगामातील पेरणीला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी योग्य तयारी करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा :
किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष
संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली, उपचारासाठी रूग्णालयात दाखल
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी महावितरणची ‘SMART’ योजना