मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी “माझी लाडकी बहिण(sisters)” योजनेत ई-केवायसी प्रक्रियेचा वेग अत्यंत मंदावला आहे. राज्यभरातील सुमारे २.४० कोटी लाभार्थी महिलांपैकी दोन-तृतीयांश महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण असून, त्यामुळे अनेक महिलांचा पुढील हप्ता थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सरकारने ई-केवायसीसाठी १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे, मात्र सध्या फक्त ८० लाख महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित १ कोटी ६० लाख महिलांना अवघ्या काही दिवसांत ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.

ई-केवायसी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः विधवा आणि घटस्फोटीत महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. केवायसी प्रक्रियेत लाभार्थिनीचा स्वतःचा आधार क्रमांक आणि कुटुंबातील सदस्याचा (पती किंवा वडील) आधार क्रमांक व ओटीपी आवश्यक आहे. मात्र अनेक महिलांच्या बाबतीत पती किंवा वडील हयात नसल्याने ओटीपी मिळवणे अशक्य ठरत आहे, परिणामी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहते.या समस्येची दखल घेत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मान्य केले की, “विधवा आणि घटस्फोटीत स्त्रियांच्या ई-केवायसीमध्ये अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी तांत्रिक प्रणालीत सुधारणा आणि पर्यायी उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
पूरग्रस्त भागातील महिलांसाठी (sisters)ई-केवायसीची मुदत १५ दिवसांनी वाढवली असली, तरी इतर सर्व महिलांसाठी १८ नोव्हेंबर २०२५ हीच अंतिम मुदत लागू राहणार आहे.मंत्री तटकरे यांनी सर्व पात्र महिलांना आवाहन केले आहे की, “वेळेत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा पुढील हप्ते मिळण्यात अडचण येऊ शकते.”

हेही वाचा :
भाजपकडून कोल्हापूर जिल्ह्याला नवे नेतृत्व — सुरेश हाळवणकर यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती
आज गुरुवारचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा…
TATA कडून Team India च्या जगज्जेत्यांना खास भेट