विश्वचषक विजेत्या भारतीय भारतीय महिला क्रिकेट संघासाठी टाटा(TATA) मोटर्सनं अनोखा निर्णय घेत प्रत्येक महिला खेळाडू आणि संघातील सदस्याला नवीकोरी आणि नुकतीच लाँच झालेली सुपरकार, तिचं थेट टॉप मॉडेल भेट देण्याचा निर्मय घेण्यात आला आहे.टीम इंडियातील महिला खेळाडूंना मिळणारी ही कार असेल, TATA Sierra. खेळाडूंना ही कार भेट स्वरुपात देणं ही अतिशय मोठी आणि स्न्माननीय बाब असल्याचं म्हटलं जात आहे.दरम्यान या निर्णयाबाबत माहिती देताना टाटा पॅसेंजर व्हीकल लिमिटेडकडे कार्यकारी संचालक आणि CEO शैलेंद्र चंद्र यांनी दिलेल्या प्रतिक्रियानुसार, ‘असामान्य खेळानं भारतीय महिला संघानं संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. त्यांचा हा प्रवास दृढ निश्चय आणि विश्वासाचं प्रतीक असून, प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत आहे.’

महिला खेळाडूंना टाटा सिएरा भेट देणं म्हणदे एका लेजंडकडे दुसऱ्या लेजंडची जबाबदारी सोपवणं. हे खऱ्या अर्थानं दोन दिग्गजांच्या भावना आणि प्रेरणेचं प्रतीक असेल, अशी सुरेख मांडणी शैलेश चंद्र यांनी केली.टाटा मोटर्सकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार भारताला पुन्हा एकदा जगज्जेता करणाऱ्या या महिला क्रिकेटपटूंना टाटा(TATA) सिएरा एसयुव्ही भेट दिली जाणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी ही कार लाँच होत असून, कंपनीकडून तिची पहिली तयार तुकडी (ज्यामध्ये टॉप मॉडेसचा समावेश आहे) ती खेळाडूंना दिली जाईल.
साधारण तीन दशकांनंतर टाटा मोटर्सकडून एक जुना ब्रँड नव्या जोमानं सादर केला जात असून, सिएरा अगदी नव्या रुपातच सादर करत टाटानं एक नवा मानस बाळगला आहे.नव्या सिएरामध्ये जुन्या कारची झलक आणि नव्या तंत्रज्ञानाचा मेळ साधण्यात आलेला असेल. यामध्ये स्कल्पेड बोनेट, शार्प अँगल लाईन्स, ब्लॅक आऊटग्रिल, फ्रंट एलईडी, ड्युअस टोन अलॉय व्हील, कलर डिटेलिंग देण्यात आलं आहे. अद्यापही या कारची किंमत समोर आली नसली तरीही तिचं बेस मॉडेल 13.50 लाख आणि टॉप मॉडेल 24 लाखांच्या घरात असेल असं म्हटलं जात आहे.

हेही वाचा :
हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा, 10 जिल्ह्यांना हाय अलर्ट
किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष
संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली, उपचारासाठी रूग्णालयात दाखल