धाराशिव | विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेली “लाडकी बहीण योजना”(Yojana) सध्या मोठ्या चर्चेत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश चांगला असला, तरी त्याचे काही अनपेक्षित परिणाम आता समोर येत आहेत. नुकत्याच धाराशिवमध्ये झालेल्या शेतकरी संवाद दौऱ्यात शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर एका महिला शेतकऱ्याने धक्कादायक खुलासा केला — लाडकी बहीण योजनेमुळे तिच्या कुटुंबात इतका तणाव निर्माण झाला की, ती आणि तिचा नवरा घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

महिलेने सांगितले की, तिचा नवरा गाडी घेण्याचा विचार करत होता, पण गाडी घेतल्यास योजनेतील दीड हजार रुपयांचा लाभ बंद होईल या भीतीने तिने त्याला विरोध केला. या कारणावरून पती-पत्नीमध्ये (Yojana)वाद झाला आणि तो इतका वाढला की आता नातं टिकवणं कठीण झालं आहे. या घटनेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.उद्धव ठाकरे म्हणाले, “लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सरकार घराघरात भांडणं लावतंय. ही योजना कुटुंबांमध्ये फूट पाडतेय. महिलांना मदत देण्याचं ढोंग करत, सरकार प्रत्यक्षात लोकांना एकमेकांविरुद्ध उभं करत आहे.”

धाराशिव दौऱ्यात ठाकरे यांनी सरकारच्या शेतकरी धोरणांवरही तीव्र टीका केली. त्यांनी म्हटलं, “सरकार फसवे पॅकेज जाहीर करतंय. आम्हाला दान नको, आमच्या मालाला हमीभाव द्या. शेतकऱ्याला भीक नव्हे, हक्काचा भाव हवा आहे.” त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधत आव्हान दिलं की, “हिम्मत असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून दाखवा.”दरम्यान, उपस्थित शेतकऱ्यांनीही सरकारकडून मिळालेल्या अपुऱ्या मदतीबद्दल तक्रारी केल्या.

काहींनी हेक्टरी फक्त काहीशे रुपयांची मदत मिळाल्याची, तर काहींनी खराब धान्य वाटप झाल्याची नाराजी व्यक्त केली. येरमाळा गावातील एका महिला उपोषणकर्तीने सांगितले की, “आम्ही चार दिवस उपोषण केलं तरी सरकारने दखल घेतली नाही. मी झाडावर चढल्यावरच सरकार जागं झालं.”या सर्व घटनाक्रमातून ग्रामीण भागातील असंतोष आणि सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी उघड झाल्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आता सामाजिक तणाव आणि वैवाहिक वादांचे कारण ठरत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

प्रियकर सोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत मृतदेह स्वयंपाक घरात पुरला

सकाळचा नाश्ता खरंच इतका महत्त्वाचा आहे का? जाणून घ्या सत्य!

लाडक्या बहिणींच्या हाती फक्त 12 दिवस, अन्यथा… 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *