लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की, “सकाळचा नाश्ता*(breakfast) हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे.” मात्र एका नव्या वैज्ञानिक संशोधनाने या पारंपरिक समजुतीला आव्हान दिले आहे.संशोधकांच्या मते, नाश्ता करणारे आणि न करणारे यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेत कोणताही लक्षणीय फरक दिसून आलेला नाही.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मेंदूला ऊर्जा मिळवण्यासाठी दोन मुख्य स्त्रोत असतात — ग्लुकोज आणि फॅट (चरबी). जेव्हा शरीर दीर्घकाळ अन्न घेत नाही, तेव्हा ते केटोन्स नावाचे घटक तयार करते. हे केटोन्स मेंदूला आवश्यक ऊर्जा पुरवतात, ज्यामुळे दीर्घ उपवासानंतरही मेंदू नीट कार्य करू शकतो.संशोधनात असेही आढळले की, ८, १२ किंवा १६ तासांचा उपवासही मेंदूसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. शरीर आणि मेंदू या अवस्थेला नैसर्गिकरित्या जुळवून घेतात.
तज्ज्ञांच्या मते, प्रौढ व्यक्तींनी कधी कधी नाश्ता(breakfast) चुकवला तरी त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत नाही. त्यांचे शरीर आणि मेंदू या बदलाशी सहज जुळवून घेतात. मात्र, मुलांसाठी नाश्ता अत्यावश्यक आहे.मुलं वाढीच्या टप्प्यात असतात, त्यामुळे त्यांना नियमित आणि पौष्टिक नाश्ता मिळणे गरजेचे आहे. यामुळे त्यांच्या शरीराच्या वाढीसह मेंदूचा विकासही योग्य प्रकारे होतो.

हेही वाचा :
लाडक्या बहिणींच्या हाती फक्त 12 दिवस, अन्यथा…
रात्री जेवणानंतर आईस्क्रीम किंवा गोड खाण्याची सवय आहे? शरीरात काय होतात बदल, जाणून घ्या
सोनाक्षी सिन्हा हिने लग्नाच्या 16 महिन्यामध्येच जहीर इक्बाल याच्याबद्दल केला मोठा खुलासा