लाडकी बहीण योजना आजही महाराष्ट्रासारख्या राज्यात चर्चेचा विषय असतानाच एक मोठी घोषणा महिलांसाठी करण्यात आली आहे. थेट तारखेसहीत ही घोषणा केली आहे हे विशेष! नेमकी कोणी आणि काय घोषणा केली आहे जाणून घेऊयात. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेवरुन आजही आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच आता अशाच एका योजनेची चर्चा एका बड्या राज्यात आहे. खरं तर मध्य प्रदेशमधील ‘लाडली बेहना’ योजनेमधून प्रेरणा घेत महाराष्ट्रातील ही योजना सुरु करण्यात आलेली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले (deposited)जातात.

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरल्याचं पाहायला मिळालं. आता अशाच एका योजनेची बिहारमध्ये चर्चा आहे. आज म्हणजेच गुरुवारी बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडत असतानाच माजी उपमुख्यमंत्र्‍यांनी मोठी घोषणा केली आहे.बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार संपण्याच्या काही तास आधी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी मोठा धमाका केला आहे. ‘बिहारमध्ये महागठबंधनची सत्ता आल्यास महिलांच्या खात्यात मकर संक्रांतीच्या दिवशी 30 हजार रुपये टाकले जातील,” अशी घोषणा तेजस्वी यादव यांनी केली.

पहिल्या टप्प्याच्या प्रचाराचा समारोप करताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव बोलत होते. राज्यात आमचे सरकार येताच ‘आई-बहीण सन्मान योजना’ (‘माई बहन मान योजना’) लागू करण्यात येईल. या योजनेनुसार पात्र महिलांच्या खात्यात 2500 रुपये टाकले जाणार आहेत, असं तेजस्वी यादव म्हणाले. आमचे सरकार येताच 14 जानेवारीला पूर्ण वर्षाचे 30 हजार रुपये महिलांच्या खात्यात(deposited) जमा केले जातील, असे तेजस्वी यांनी सांगितले. बिहारची जनता यावेळी बदलाच्या मूडमध्ये आहे. यावेळचे मत हे परिवर्तनाचे मत असेल. हे मत एनडीए सरकारला उखडून फेकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांतील 121 मतदारसंघांचा समावेश आहे. पाटणा, भोजपूर, बक्सर, गोपालगंज, सिवान, सारण, मुइझफरपूर, वैशाली, दरभंगा, समस्तीपूर, मधेपूर, सहरसा, खडगीया, बेगुसराय, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा या 18 जिल्ह्यांत मतदान होणार आहे.18 जिल्ह्यांतील 121 मतदारसंघांवर मतदान होईल. यात 16 मंत्र्यांसह बाहुबली, उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 45,341 मतदान केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. 3.75 कोटी मतदार या टप्प्यात मतदान करणार आहेत. या टप्प्यात एकूण 1314 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 1192 पुरुष व 122 महिला आहेत.

हेही वाचा :

लिफ्टमध्येच केली सू सू अन् पुढे जे घडलं, Video Viral

तर तुमचं पॅन कार्ड बंद पडणार, 31 डिसेंबरपर्यंत वेळ अन्यथा…

धक्कादायक… लाडकी बहीण योजनेमुळे नवरा-बायकोंवर घटस्फोटाची वेळ

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *