राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवेत बदल दिसून येत होता. वातावरणातील बदलामुळे हवेत गारवा जाणवत होता. 10 तारखेनंतर राज्यात गारठा वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा थंडी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे हवामान विभागाने दिलेला पावसाचा (rain)अंदाज. राज्यात येत्या काही दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. अवकाळी पावसाने राज्यात कहर केल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिके उद्ध्वस्त झाली. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने थंडी पडायला सुरूवात झाली असे वातावरण तयार झाले होते. मात्र आता पुढील काही दिवस राज्यात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

भारतीय हवमान विभागाने राज्यात पावसाचा (rain)इशारा दिला आहे. पुढील दोन ते तीन दियास राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे, सांगली, कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार वाऱ्यासाह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.मोंथा चक्रीवादळानंतर आणखी एका चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्याने देशासह राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

हेही वाचा :

डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…

…तर प्रत्येक महिलेच्या खात्यावर 30 हजार रुपये होणार जमा

लिफ्टमध्येच केली सू सू अन् पुढे जे घडलं, Video Viral

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *