सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी मजेशीर, तर भयावह व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, वेगवेगळ्या प्रकारच्या डान्स रिल्स व्हायरल होत असतात. यामध्ये तुम्ही लहानमुलांचे अनेक व्हिडिओ पाहिले असती. असे म्हणतात मुले ही देवाघरची फुले (Elevator)असतात. पण अनेकदा काही मुले अतिशय खोडकर असतात. त्यांच्या अंगात मस्तीचे किडे वळवळत असतात. यामुळे बऱ्याचदा ही मस्ती त्यांच्याच अंगलट येते. व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे.

सध्या असाच एका चिमुकल्याला त्याची मस्ती अंगलट आली आहे. एका चिमुकल्याने लिफ्टमध्ये असताना असे काही केले आहे, ज्यामुले तो लिफ्टमध्ये (Elevator)अडकून बसला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चिमुकला लिफ्टमध्ये सू करत आहे. यानंतर जे घडलं भयंकर आहे. सुरुवातीला काही वेळ सर्व काही नीट असते. परंतु लिफ्टमधून उतरताना दार उघडत नाही. यामुळे लहानगा लिफ्टचे बटन प्रेस करतो.
परंतु या मुलाने लिफ्ट्या बटनांवर सू केलेली असते. यामुळे त्यामध्ये काही बिघाड होता. ज्यामुळे लिफ्टचा दरवाजा उघडत नाही. मुलगा सतत बटन दाबत राहतो. पण लिफ्टचा दरवाजा उघडत नाही. तसेच लिफ्टमधील लाइट देखील बंद होते. यामुळे चिमुकला चांगलाच घाबरतो. यानंतर नेमकं काय घडलं याची माहिती मिळालेली नाही. सध्या या घटनेचा लिफ्टमधील सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
— BrainIess (@BrainIesspeople) November 5, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @BrainIesspeople या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारोंनी पाहिले आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत, याला इस्टंट कर्मा म्हणत आहेत. तर कोणी मजाकमध्ये लिफ्टला (Elevator)पण राग आल असेल असे म्हणत आहेत, तर काहीजण पोरंग जरा जास्तच चावट दिसतंय. तर कोणी पोरंग लयंच वांड आहे असे म्हणत आहे. अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा :
तर तुमचं पॅन कार्ड बंद पडणार, 31 डिसेंबरपर्यंत वेळ अन्यथा…
धक्कादायक… लाडकी बहीण योजनेमुळे नवरा-बायकोंवर घटस्फोटाची वेळ
प्रियकर सोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत मृतदेह स्वयंपाक घरात पुरला