चेन्नई सुपर किंग्जने डेवाल्ड ब्रेव्हिसला इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये रिप्लेसमेंट प्लेअर म्हणून करारबद्ध करण्यासाठी टेबलाखालून पैसे दिले होते, असा खळबळनजक दावा रविचंद्रन अश्विनने केला आहे. जखमी वेगवान गोलंदाज गुर्जपनीत सिंगचा बदली खेळाडू(player) म्हणून करारबद्ध झालेल्या डेवाल्ड ब्रेव्हिसला 2.2 कोटी रुपयांत विकत घेण्यात आलं होतं. डेवाल्ड ब्रेव्हिसला क्रिकेट जगतात बेबी डिव्हिलअर्स म्हणून ओळखलं जातं. आर अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवरुन हा दावा केला आहे.

आर अश्विनने दावा केला आहे की, अनेक संघांना रिप्लेसमेंट म्हणून डेवाल्ड ब्रेव्हिसला संघात घेण्याची इच्छा होती. मात्र चेन्नई संघाने त्याच्या एजंटशी तडजोडी करत जास्त पैसे खर्च केले आणि त्याला संघात घेतलं. अश्विनने असा युक्तिवाद केला की ब्रेव्हिससारख्या खेळाडूंना (player)त्यांना लिलावात त्यांच्या मूळ किमतीपेक्षा जास्त किंमत मिळेल आणि त्यांच्याकडे वाटाघाटीचा अधिकार असेल याची जाणीव आहे.

“मी तुम्हाला ब्रेव्हिसबद्दल काहीतरी सांगतो. मागच्या हंगमात सीएसकेकडून तो चांगला खेळला. काही संघ त्याच्याशी चर्चा करत होते. काही संघाने किंमतीमुळे त्याच्याशी चर्चा करणं सोडून दिलं. जेव्हा त्याला बदली खेळाडू म्हणून साईन केलं जाणार होतं, तेव्हा मूळ किंमतीत केलं जाईल अशी अपेक्षा होती. पण तुम्ही एंजटशी बोलता आणि खेळाडू सांगतो की तुम्ही मला इतकी किंमत जास्त दिली तर मी येतो,” असं अश्विनने सांगितलं.
“हे असं होतं कारण खेळाडूला माहिती असतं की जर पुढच्या हंगामात त्याला रिलीज केलं तर त्याची किंमत वाढेल. म्हणून त्याची संकल्पना अशी होती की, तू मला आता चांगले पैसे दे, नाहीतर मी पुढच्या वर्षी जास्त पैसे आकारेन. सीएसके त्याला पैसे देण्यास तयार होते, म्हणून तो आला. शेवटच्या भागात, सीएसकेचे संयोजन मजबूत होते. ते आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात 30 कोटी रुपयांसह जातील,” असं तो पुढे म्हणाला.
आयपीएल 2025 च्या हंगामाच्या मध्यात 18 एप्रिल रोजी ब्रेव्हिसला सीएसकेने करारबद्ध केलं होतं. स्पर्धेत चेन्नईला त्यांच्या फलंदाजी क्रमवारीत अडचणी येत होत्या आणि त्यांना नवीन खेळाडू आणण्याची नितांत आवश्यकता होती. संघाने आयुष म्हात्रे आणि ब्रेव्हिस यांना बदली खेळाडू म्हणून करारबद्ध केले आणि हंगामाच्या शेवटच्या काही सामन्यांमध्ये त्यांना त्याचा फायदा झाला.
“चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) टाटा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी जखमी गुरजपनीत सिंगच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या दडेवाल्ड ब्रेव्हिसला करारबद्ध केलं आहे. ब्रेव्हिस पूर्वी मुंबई इंडियन्सचा (एमआय) भाग होता, जिथे त्याने 10 सामने खेळले. तो 2.2 कोटी रुपयांत सीएसकेमध्ये सामील होईल,” असं आयपीएलच्या एका निवेदनात 2025 मध्ये म्हटलं होते.ब्रेव्हिसने आयपीएल 2025 मध्ये 6 सामन्यांमध्ये 225 धावा ठोकल्या. त्याने 2 अर्धशतके केली आणि 180 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली.
हेही वाचा :
शेतकऱ्यांचा बुधगावात मेळावा; राजू शेट्टी, सतेज पाटील राहणार उपस्थित
“130 किमी रेंजसह दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त ₹81,000 मध्ये विक्रीला
जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या