क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला आहे. सारा तेंडुलकरची मैत्रीण असलेल्या सानिया चंडोक हिच्याशीच तो लग्नगाठ बांधणार आहे. दरम्यान, सध्या तेंडलकर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. असं असतानाच आता सारा तेंडुलकरनेही आपल्या चाहत्यांना एक मोठी खुशखबर(good news) दिली आहे. विशेष म्हणजे ही घोषणा करताना काही फोटेदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिच्या या फोटोंवर सध्या कमेंट्सचा पाऊस पडतोय. विशेष म्हणजे तिने आपल्या चाहत्यांसोबत ही खास बाब शेअर केल्यामुळे तिचे अभिनंदनही केले जात आहे.

सारा तेंडुलकरच्या भावाच्या म्हणजेच अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याची देशभरात चर्चा होत आहे. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आहे. या कार्यक्रमाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र त्याआधीच सारा तेंडुलकरने एक अनोखी खुशखबर(good news) दिलीय. तिने मुंबईत नुकतेच पिल्टेस्स अकॅडमी चालू केली असून तिचे उद्घाटन केले आहे. सचिन तेंडुलकरच्या हाताने नारळ फोडून या अकॅडमीचे उद्घाटन केले आहे. अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्यानंतर साराच्या या अकॅडमीचे उद्घाटन झाले आहे.

विशेष म्हणजे या उद्घाटनाच्या वेळी अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चंडोक हीदेखील उपस्थित होती. सारा तेंडुलकरची ही पिलेट्स अकॅडमी मुंबईतील अंधोरी इथे सुरू करण्यात आली आहे. शरीरातील स्नायू मजबूत करण्यासाठी, शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी पिलेट्स अकॅडमीत प्रशिक्षण दिले जाते. पिलेट्स ही एक व्यायाम प्रणाली आहे.सारा तेंडुलकरच्या पिलेट्स अकॅडमीच्या उद्घाटनामुळे तिच्या काही मैत्रिणी उपस्थित होत्या. सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चंडोक तसेच सारा तेंडुलकरच्या मैत्रीणी उपस्थित होत्या.
विशेष म्हणजे या प्रसंगी सानिया चंडोक हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करून आली होती.दरम्यान, एकीकडे अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झालेला असताना दुसरीकडे सारा तेंडुलकरनेही आपला नवा प्रोजेक्ट सुरू केल्यामुळे तेंडुलकर कुटुंबात दुहेरी आनंद चालून आल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा :
शेतकऱ्यांचा बुधगावात मेळावा; राजू शेट्टी, सतेज पाटील राहणार उपस्थित
“130 किमी रेंजसह दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त ₹81,000 मध्ये विक्रीला
जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या