कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

“उध्वस्त धर्म शाळे”सारखीअवस्था झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात आठच दिवसापूर्वी रंगभूमीवरच्या निष्ठावंत कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून एक आगळ्यावेगळ्या प्रकारे निषेध नोंदवला. आणि आता नाट्यगृहाला लागूनच असलेल्या शाहू खासबाग मैदानाच्या(Maidan) “धोबीपछाड” अवस्थेकडे कुस्ती पंढरीचे लक्ष वेधण्यासाठी पैलवानांनीलाल आखाडा परिसरात अभिनव पद्धतीचे आंदोलन केले. या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंकडे प्रशासनाचे झालेले कमालीचे दुर्लक्ष रंगकर्मी आणि पैलवानांनी निषेधात्मक आंदोलनाच्या माध्यमातून अधोरेखित केले आहे. राजर्षी शाहू छत्रपतींनी इसवी सन 1904 मध्येनाट्यगृहाची उभारणी केली.पॅलेस थिएटर अशी त्याची ओळख होती. नंतर या नाट्यगृहाला संगीत सूर्य केशवराव भोसले यांचे नाव देण्यात आले. त्यानंतर या नाट्यगृहाला जोडूनच शाहू खासबाग मैदानाची बांधणी करण्यात आली. इसवी सन 1912 मध्ये या कुस्ती मैदानाचे भव्य उद्घाटन करण्यात आले.

इमाम बक्ष आणि मोईद्दीन यांच्यातक्रमांक एक ची कुस्ती तिकीट लावून आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या कुस्ती सामन्यातून विजेत्या पैलवानाला चांदीची गदा देण्याची प्रथा राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली. या कालांतराने या खासबाग मैदानाला राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आले. ओपन थियेटर म्हणूनही या कुस्ती मैदानाचा (Maidan)वापर करण्यात येऊ लागला होता.या दोन्ही ऐतिहासिक वास्तू राज्य शासनाच्या मालकीच्या होत्या. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या दोन्ही वास्तू महापालिकेकडे हस्तांतरित केल्या. या दोन्ही वास्तू सांस्कृतिक आणि क्रीडासंस्कृतीच्या मानदंड म्हणून ओळखल्या जात होत्या आणि आजही तशीच त्यांची ओळख आहे.ऑगस्ट 2024 मध्ये ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला मध्यरात्री आग लागली. ही आग इतकी भीषण होती की हे नाट्यगृह बेचिराख झाले. शेजारच्या कुस्ती मैदानाचीही वाताहत झाली. विशेष म्हणजे नाट्यगृह आणि शाहू खासबाग मैदान यांच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाचा सात कोटी रुपयांचा निधी खर्च झाला होता.

नूतनीकरणावर झालेल्या खर्चाबद्दल सर्वसामान्य जनतेकडून आशंका व्यक्त केली जात होती. सात कोटी रुपयांच्या तुलनेत सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या नव्हत्या. त्यामुळेझालेल्या खर्चाचे ऑडिट व्हावे अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवरलागलेल्या आगीबद्दलहीसंशय व्यक्त केला जात होता.ही आग अपघाताने लागलेली नाही तर ती मुद्दाम लावली गेली आहे काय असा प्रश्नउपस्थित केला जात होता.विद्युत तज्ञांकडून आगीत भक्षस्थानी पडलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची तपासणी केली तेव्हा ही आग शॉर्टसर्किटमुळे लागलेली नाही असा अहवाल संबंधितांनी दिला. त्यानंतर महापालिकेच्या वतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आल्यानंतरअज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेण्यात राजवाडा पोलिसांना सपशेल अपयशआले आहे आणि आता तर हा गुन्हा फाईल बंद करण्यात आला आहे.केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बाधणीसाठीराज्य शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करून दिला.

जवळपास 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊनहीकेशवराव भोसले नाट्यगृहाचे निर्माण अतिशय संथ गतीने सुरू होते. हे नाट्यगृह निर्धारित वेळेत रसिकांच्या सेवेला दाखल होईल असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते.प्रत्यक्षात मात्र नवनिर्माण हे अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे रंगभूमीवरील कलाकार कमालीचे संतप्त आणि नाराजही झाले होते.अपूर्ण अवस्थेत असलेल्याकेशवराव भोसले नाट्यगृहाच्या रंगमंचावर रंगभूमीवरील कलाकारांनीसांस्कृतिक कार्यक्रम सादर करून अभिनव पद्धतीचा निषेध नोंदवला होता. आता हे नाट्यगृह नवीन वर्षाच्या मागच्या महिन्यात रसिकांच्या सेवेला रुजू होईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.नाट्यगृहाला लागलेल्या आगीमध्ये शाहू खासबाग मैदानाचीही पडझड झाली होती. दुर्दशा झाली होती. आग लागण्याच्या आधी एक वर्षभर या ऐतिहासिक मैदानाची भिंत कोसळून त्यामध्ये एक महिला ठार झाली होती.सध्या या शाहू खासबाग मैदानाची अवस्था अतिशय बिकट आहे. नाट्यगृहाच्या बांधकामाचे बरेचसे साहित्य
मैदानाच्या लाल आखाड्यात टाकण्यात आले आहे. जणू काही मैदानाच्या छाताडावरचसाहित्य टाकले आहे.

शाहू खासबाग मैदानातील कुस्तीचा आखाडा हा अतिशय महत्त्वाचा असून तो या मैदानाचे हृदय असल्याचे मानले जाते. या मैदानाची आजची अवस्था पाहून कुस्ती शौकीन आणि पैलवान व्यथित झाले होते. या पैलवानांनी सोमवारी खासदार मैदानात येऊन निषेधात्मक आंदोलन केले.मैदानाच्या(Maidan) लाल आखाड्यात ठेवलेले बांधकामाचे साहित्य तातडीने हलवण्यात यावे.खासबाग मैदानाला गतवैभव प्राप्त करून द्यावे अशा मागण्या या पैलवान मंडळींनी केलेल्या आहेत.राज्य शासनाच्या उपलब्ध झालेल्या निधीतून शाहू खासबाग मैदानात”कुस्ती संग्रहालय”उभारण्यात येणार होते. त्यासाठी मैदान आवारातील रेशनिंग चे ऑफिसही हलवण्यात आले आहे. पण कुस्ती संग्रहालय उभारणीच्या कोणत्याही हालचाली महापालिका प्रशासनाकडून सुरू नाहीत.

हेही वाचा :

बादली घेतली, साबण लावला अन् व्यक्तीने चक्क ट्रेनमध्ये केली आंघोळ, मग रेल्वेने अशी ॲक्शन घेतली की… Video Viral

‘त्या’ विधानावरुन ठाकरे सेना आक्रमक! ‘1800 कोटींची जमीन 500 रुपये…’

राज्यातील थंडीची चाहूल वाढली! जाणून घ्या कसे असणार हवामान

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *