निरोगी आरोग्यासाठी आपल्या शरीराला योग्य पोषणतत्वे मिळणे आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला आवळा (nutrients)हा नैसर्गिक सुपरफूड मानला जातो. त्वचा, केस आणि संपूर्ण आरोग्यासाठी तो अत्यंत लाभदायक आहे. न्यूट्रिशनिस्ट डॉ. शिखा सिंग यांनी नुकताच त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आवळा खाण्याचा आणि त्याचा रस बनवण्याचा एक अनोखा आणि फायदेशीर मार्ग सांगितला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, दररोज सकाळी आवळ्याचा रस प्यायल्यास वजन कमी होण्यास, त्वचेची नैसर्गिक चमक वाढविण्यास आणि केस मजबूत करण्यास मदत होते. विशेषतः ज्या वधूंना लग्नापूर्वी वजन कमी करायचे आहे किंवा चेहऱ्यावर तेज आणायचे आहे, त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे.

रस बनविण्यासाठी १ आवळा, कच्ची हळद, आले, कढीपत्ता आणि चिमूटभर काळी मिरी घेऊन मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. तयार झालेला हा रस दररोज सकाळी प्यायल्यास शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात.

डॉ. शिखा सांगतात की, या पेयाचे नियमित सेवन केल्याने शरीराची(nutrients) चयापचय क्रिया सुधारते, त्यामुळे चरबी पटकन बर्न होते आणि वजन नियंत्रणात राहते. तसेच, आवळ्यातील नैसर्गिक घटक त्वचेला आतून पोषण देतात, ज्यामुळे त्वचा तेजस्वी आणि केस अधिक मजबूत व चमकदार होतात.

त्यांच्या मते, “जर तुम्हाला चेहऱ्यावर जादुई ग्लो हवा असेल किंवा केस गळती कमी करायची असेल, तर हा आवळ्याचा रस रोज सकाळी घेणे सुरू करा.” एकूणच, आवळा हा केवळ एक फळ नाही, तर आरोग्य, सौंदर्य आणि तंदुरुस्तीचा अमृतसमान स्रोत आहे.

हेही वाचा :

बादली घेतली, साबण लावला अन् व्यक्तीने चक्क ट्रेनमध्ये केली आंघोळ, मग रेल्वेने अशी ॲक्शन घेतली की… Video Viral

‘त्या’ विधानावरुन ठाकरे सेना आक्रमक! ‘1800 कोटींची जमीन 500 रुपये…’

राज्यातील थंडीची चाहूल वाढली! जाणून घ्या कसे असणार हवामान

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *