हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सर्दी, खोकला, साथीचे आजार वाढू लागतात. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे काहींना वारंवार खोकला किंवा सर्दी होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही जर सतत आजारी पडत असाल तर रोजच्या आहारात बदल करणे आवश्यक आहे. कारण आहारात खाल्लेल्या पदार्थांचा आरोग्यावर लगेच दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये कोणत्या पेयांचे अजिबात सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या (drinks)सेवनामुळे सर्दी खोकला वाढून आरोग्याला हानी पोहचू शकते.

उन्हाळाच्या दिवसांमध्ये सातूच्या पेयाचे(drinks) नियमित सेवन केले जाते. यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. पण हिवाळ्यात सत्तूच्या पेयाचे अजिबात सेवन करू नये. यामुळे सर्दी खोकला वाढू लागतो.तोंडात वाढलेली दुर्गंधी किंवा अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी बडीशेप पाणी प्यायले जाते. पण वारंवार बडीशेप पाणी प्यायल्यास शरीरातील कफ दोष वाढू शकतो.
हिवाळ्यात केळी खाऊ नये. केळी खाल्ल्यामुळे कफ वाढून सतत सर्दी किंवा खोकला होतो. वारंवार होणाऱ्या खोकल्यामुळे शरीराला हानी पोहचते. तसेच केळ आणि दुधाचे मिश्रण एकत्र प्यायल्यामुळे घशात जडपणा, रक्तसंचय आणि कफ वाढतो.नारळ पाणी नैसर्गिकरित्या थंड असते. नारळ पाण्याच्या अतिथंड गुणधर्मामुळे थंडीच्या दिवसांमध्ये सायन्स किंवा सर्दी खोकला वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात पाणी पिताना आरोग्याची काळजी घ्यावी.थंडीमध्ये सुद्धा अनेक लोक कोल्ड्रिंक किंवा सोडा पितात. सोडा प्यायल्यामुळे सर्दी खोकला आणि ताप येण्याची शक्यता असते. याशिवाय अतिथंड पदार्थ प्यायल्यामुळे घशात वेदना होतात.

हेही वाचा :
Realme GT 8 Pro युजर्ससाठी घेऊन येणार एक खास सरप्राईज, या दिवशी भारतात होणार लाँच
नगरपरिषद इमारतीच्या छतावर कर्मचाऱ्यानं संपवलं आयुष्य
महाराष्ट्रावर नव्या संकटाची चाहूल! पुढचे २४ तास अतिमहत्त्वाचे!