सांगली शहर हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काळ्या खणीजवळील कुरणे यांच्या घोड्याच्या तबेल्यात मित्राचाच खून (murder)केल्याची ही थरारक घटना घडली आहे. अमीर रावसाहेब कन्नुरे (वय 33, रा. हनुमाननगर, सांगली) असे मृताचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी मलिक ऊर्फ मलक्या दस्तगीर मुलाणी (वय 28, रा. वखारभाग, सांगली) आणि निशाद भीमसेन दासूद (वय 20, रा. काळी खण, सांगली) या दोघा संशयितांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अमीर आणि संशयित हे तिघेही एकमेकांचे मित्र असून त्यांना दारूचे व्यसन होते. शनिवारी रात्री मद्यपानाच्या नादात तिघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर शिवीगाळ (murder)व दमदाटीत झाले. या दरम्यान, अमीरने दोघा मित्रांना अश्लील शिवीगाळ केल्याने त्यांचा राग अनावर झाला. रागाच्या भरात मलिक आणि निशाद यांनी अमीरचा काटा काढण्याचा कट रचला.
रविवारी रात्री, अमीर नेहमीप्रमाणे काळी खण परिसरातील तबेल्यात कामावर आला आणि तिथेच झोपला होता. त्याच वेळी दोघे आरोपी त्याच्यावर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसले होते. अमीरचा साथीदार लघुशंकेसाठी बाहेर गेल्याचा फायदा घेत, दोघांनी झोपेत असलेल्या अमीरवर एडक्याने सपासप सात वार करून त्याचा निर्घृण खून केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेनंतर अमीरचा साथीदार परत येताच त्याने अमीरला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. त्याने तत्काळ इतर मित्रांच्या मदतीने त्याला सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने पथके तयार करून तपास सुरू केला. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या नेतृत्वाखालील टीमने जलद कारवाई करत मलिक ऊर्फ मलक्या याला त्याच्या घरातून आणि निशाद याला स्टेशन चौकातून अटक केली.
या कारवाईत सहायक निरीक्षक चेतन माने, उपनिरीक्षक प्रवीण कांचन, सतेज कार्वेकर, सहायक उपनिरीक्षक दिनेश माने, तसेच हवालदार संदीप साळुंखे, अमर मोहिते, कॉन्स्टेबल योगेश पाटील, आर्यन देशिंगकर आणि सुनील पाटील यांनी सहभाग घेतला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमीरच्या खुनामागे अल्पशा वादातून निर्माण झालेली सूडभावना आणि दारूच्या नशेत घेतलेला निर्णय कारणीभूत ठरला आहे. या घटनेने सांगली शहरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर रवाना…
राज ठाकरेंचा मनसे महाविकास आघाडीत असणार ‘दिलसे’…! निवडणुकीत येणार रंगत
अभिनेते जितेंद्र जागीच कोसळले; प्रार्थना सभेतील व्हिडीओ समोर…