अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान यांच्या आई झरीन खान यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत करण्यात (Video)आलं होतं. या वेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. हृतिक रोशन, त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद, मुलगा हृदान, सुझान खान, फरदीन खान, राणी मुखर्जी, मलायका अरोरा, संजय खान, आणि जायेद खान हे सर्व या प्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या एका घटनेने सोशल मीडियावर मोठे लक्ष वेधले आहे. 83 वर्षीय ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र हे सभेला पोहोचले असताना एका पायरीवर अडखळून जमिनीवर जोरात पडले. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ धाव घेत त्यांना उचललं. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. काही क्षणांनी त्यांनी स्वतः उठून उभं राहत ‘मी ठीक आहे’ असं हसत सांगितलं.
जितेंद्र यांचा हा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. यात ते आपल्या कारमधून उतरताना आणि चालताना दिसतात, मात्र पायरीकडे लक्ष न गेल्याने त्यांचा तोल जातो. चाहत्यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिलं, “त्यांनी साधे शूज घालायला हवे होते, शूजमुळेच तोल गेला असावा”, तर दुसऱ्याने म्हटलं, “आशा आहे की ते बरे असतील.”
याचदरम्यान, प्रार्थना सभेनंतर बाहेर येताना जितेंद्र यांनी पुन्हा एकदा पापाराझींशी संवाद साधताना मस्करीत पायरीकडे जाऊन अडखळण्याचं नाटक केलं, ज्यामुळे उपस्थित सगळे हसू लागले. त्यांच्या या मनमिळाऊ आणि हसऱ्या स्वभावामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा :
वजन कमी करण्यासाठी आवळ्यामध्ये ‘हे’ न्युट्रियंट्स पदार्थ मिसळा, होईल चमत्कार!
महापालिका प्रशासनाकडून शाहू मैदान “धोबीपछाड”!
बादली घेतली, साबण लावला अन् व्यक्तीने चक्क ट्रेनमध्ये केली आंघोळ, मग रेल्वेने अशी ॲक्शन घेतली की… Video Viral