सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असताता की, पाहून आपला दिवस चांगला जातो. तर काही असे व्हिडिओ पाहयला मिळतात की, तळपायाची आग मस्तकात जाते. सध्या असाच एक संतापजनक कृत्याचा (customer)व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अलीकडच्या काळात माणुसकी जशी हरवत चालली आहे. रेल्वे स्टेशनवरील एका तरुण विक्रेत्यासोबत असे काही घडले आहे की, संताप येईल. एका ग्राहकाने(customer) विक्रेत्याला पैसे न देताचा पळ काढला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक तरुण धावत्या ट्रेनमागे पळताना दिसत आहे. एका ग्राहकाकडे खिडीकीतून सामानाचे पैसे मागत आहे. पण ग्राहक काही पैसे देण्यास तयार नाही. तरुण ग्राहकाला कळकळीची विनंती करत आहे. तसेच ट्रेन वेगाने धावत असताना आपल्या कष्टाची किंमत घेण्यासाठी तरुणाची झटपट सुरु आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून संतापची लाट उसळली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @MasalaaMinds या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ही घटना नेमकी कुठे घडली, याची माहिती अस्पष्ट आहे. पण अनेकांनी ग्राहकावर संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्यांने, मला आशा आहे की त्या ग्राहकाला त्याचे कर्म परत मिळेल, तर दुसऱ्या एकाने माणुसकी मेली आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने कसे लोक आहेत या जगात, दुसऱ्याच्या कष्टाचे चोरताना पण लाज नाही वाटत यांना असे म्हटले आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावर देण्यात आल्या आहेत.

यापूर्वी देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण यामध्ये ग्राहकाचे पेमेंट फसले होते आणि याच वेळी त्याची ट्रेन सुटली होती. यावेळी दुकानदाराने ग्राहकाला कॉलरने पकडून ठेवले होते. ग्राहकाला त्याचे महागडे घड्याळ केवळ दोन समोशाच्या बदल्यात द्यावे लागले होते.

हेही वाचा :

वाहनधारकांनो HSRP नंबर प्लेट संदर्भात अंतिम मुदत वाढवली

बँकेचा नवा नियम! ‘या’ सेवेसाठी लागणार अतिरिक्त शुल्क

१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा Cheese Garlic Bread

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *