जर तुमचं वाहन 2019 पूर्वी नोंदणीकृत असेल आणि अजूनही त्यावर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवलेली नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने यासाठी 30 नोव्हेंबर 2025 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. या तारखेनंतर नियमाचं उल्लंघन केल्यास वाहनधारकांवर(number) ₹10,000 पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.केंद्र सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर HSRP बसवणं अनिवार्य केलं आहे. या नियमाची मुदत आतापर्यंत तीनदा वाढवण्यात आली होती. एप्रिल, जून आणि ऑगस्टनंतर आता चौथ्यांदा 30 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

मात्र, मुंबईसह राज्यभरातील लाखो वाहनधारकांनी अजूनही ही प्लेट बसवलेली नाही. त्यामुळे सरकार पुन्हा एकदा मुदतवाढ देणार का, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे. अद्याप परिवहन विभागाने कोणताही नवीन निर्णय घेतलेला नाही.प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर 2025 ही अंतिम तारीख असून त्यानंतर कठोर कारवाई होणार आहे.
– HSRP साठी अर्ज केलेला पण प्लेट बसवलेली नाही: ₹1,000 दंड
– HSRP साठी अर्जच केलेला नाही आणि प्लेट बसवलेली नाही: ₹10,000 दंड
म्हणजेच, विलंब केल्यास खिशावर मोठा भार पडू शकतो. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर प्लेट बसवून घेणं फायदेशीर ठरणार आहे.
HSRP च्या नावाखाली (number)नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट वेबसाइट्स आणि एजंट्स सक्रीय झाले आहेत. अशा ठगांपासून सावध राहा आणि फक्त अधिकृत सरकारी पोर्टलवरूनच HSRP साठी अर्ज करा, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. सध्या राज्यभरात 20 हून अधिक अधिकृत फिटमेंट सेंटर कार्यरत आहेत. त्यामुळे प्रक्रिया सोपी झाली आहे आणि नागरिकांना आता दीर्घ प्रतीक्षा करावी लागत नाही.
तसेच राज्यातील केवळ 40 टक्के वाहनांवरच HSRP प्लेट बसवली गेली आहे. त्यामुळे केंद्र सरकार जानेवारी 2026 पर्यंत मुदत वाढवेल का यावर सर्वांचे लक्ष आहे. तथापि, जर मुदतवाढ झाली नाही तर 1 डिसेंबरपासून कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं वाहन 2019 पूर्वीचं असेल, तर लगेच HSRP बसवून घ्या आणि दंड टाळा.

हेही वाचा :
बँकेचा नवा नियम! ‘या’ सेवेसाठी लागणार अतिरिक्त शुल्क
१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा Cheese Garlic Bread
लग्नाच्या चर्चांदरम्यान विजय देवरकोंडाने सर्वांसमोर रश्मिकाला केलं किस; व्हिडीओ व्हायरल