गुगल पे, फोन पेला BHIM लोळवणार मातीत; सरकारने सुविधांचा खुराक वाढवला
सरकारी पेमेंट ॲप BHIM बाजारात धमाका करण्यास उत्सुक(facilities) आहे. 2016 साली बाजारात येऊन सुद्धा भीमला बाजारात कोणतीच जोरदार कामगिरी करता आली नाही. गुगल पे, फोन पे आणि आता संकटात सापडलेल्या पेटीएमसह इतर पेमेंट ॲपने मोठा पसारा वाढवला. पण आता भीम पुन्हा बाजारात मोठा पल्ला गाठण्यासाठी सज्ज झाले आहे. बाजारातील दिग्गज ॲपला भीम थेट फाईट देईल. या पैलवानाला आखाड्यात उतरविण्यासाठी सुविधांचा खुराक देण्यात येत आहे.
Open Network for Digital Commerce (ONDC) च्या मदतीने मेकओव्हर(facilities) करण्यात येणार आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, गुगल पे, फोन पेची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी भीम युपीआय ॲपमध्ये आवश्यक ते बदल आणि रणनीती ठरविण्यात येत आहे. या ॲपच्या मदतीने खाद्यान्न आणि शीतपेय, किराणा, फॅशन आणि कपडे खरेदीवर ऑफर्स देण्यात येतील.
सध्या डिजिटल मार्केटमध्ये गुगल पे आणि फोन पे हे सध्या सुरमा आहेत. दिग्गज खेळाडू आहेत. पेटीएमवरील संकटांमुळे भीमला तिसऱ्या क्रमांकावर उडी घेण्याची मोठी संधी आहे. त्यासाठी ॲपमध्ये अमुलाग्र बदल आणि धोरणात बदल करणे गरजेचे आहे. ओएनडीसीचे माजी उपाध्यक्ष राहुल हांडा यांना आता भीम ॲपचे मुख्य व्यावसायिक अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.
गुगल पे, फोन पे हे थर्ड पार्टी पेमेंट ॲप म्हणून सध्या भारतात लोकप्रिय आहेत. पेटीएमवरील निर्बंधामुळे आता तिसरी जागा रिक्तच म्हणावी लागेल. या जागेवर टुणकन उडी मारण्याची नामी संधी भीमला आहे. इतर पेमेंट ॲप बाजारात दमदार कामगिरी करत असताना भीम का पराक्रम दाखवू शकत नही, या प्रश्नाचं लवकरच भीम ॲप उत्तर देणार आहे. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या एका वृत्तानुसार, 5-7 दशलक्ष व्यापार असलेल्या पेटीएमचा मोठा वाटा भीमला मिळू शकतो. त्यासाठी धोरण आखण्यात येत आहे.
हेही वाचा :
रणबीर कपूर एकाच वेळी चार मुलींसोबत होता रिलेशनमध्ये
ऋषभ पंतशी लग्न करणार का? उर्वशीच्या उत्तराने चर्चा केली शांत
तब्बल 12 वर्षांनंतर कुबेर राजयोग बनल्याने ‘या’ राशींची होणार भरभराट