इचलकरंजी मधील कोरोची येथे लग्न लावत नसल्याच्या कारणावरून एका मुलाने स्वतःच्या आईवर(Mother) विळतीने जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सुरेखा दादू गेजगे (वय 45, रा. इंदिरानगर, कोरोची) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या उजव्या हातातील अंगठ्याजवळील बोटाचा पेर तुटून खाली पडला. जीवावरचा प्रसंग ओढवूनही त्या थोडक्यात बचावल्या.

या प्रकरणी मुलगा वैभव दादू गेजगे (वय 24) याच्याविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.सुरेखा गेजगे(Mother) या पती, तीन मुले, सून आणि नातवंडांसह राहतात. त्यांचे पती दादू हे सेंट्रिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह पाहतात. मुलगा वैभव हा अविवाहित असून तो दारूच्या आहारी गेला असल्याने घरात नेहमी भांडणे घालण्याची त्याची सवय झाली होती.

बुधवारी रात्री सर्वजण जेवत असताना वैभवने पुन्हा लग्नाच्या मुद्द्यावरून आईशी वाद घालण्यास सुरुवात केली. समजावून सांगूनही तो आई तसेच कुटुंबीयांना शिवीगाळ करत होता. “लवकर लग्न लावून दे, नाही तर तुला सोडणार नाही,” अशी धमकी देत त्याने जवळच असलेली लोखंडी विळती उचलली आणि आईच्या(Mother) दिशेने झेप घेतली.आई सुरेखा यांनी हात मध्ये घालून बचाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावर विळतीचा जोरदार वार बसून त्यांच्या बोटाचा पेर तुटला आणि त्या रक्तबंबाळ झाल्या. हे पाहून वैभवने विळती जागेवर फेकून तेथून पळ काढला.

त्यानंतर कुटुंबीयांनी सुरेखा यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

PL 2026 च्या आधी Mumbai Indiansची मोठी चाल…

हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो! जाणून घ्या कारणे आणि उपाय

पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *