पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अभिनेत्री मलाइका अरोरा हिच्या आक्षेपार्ह छायाचित्राचा वापर करून अनधिकृत जाहिरात करणाऱ्या शुभ डेव्हलपर्स या बांधकाम व्यावसायिकावर कडक कारवाई केली आहे. महापालिकेच्या स्काय होल्डिंग विभागाने या प्रकरणात ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, या कारवाईनंतर शहरातील जाहिरात(advertisement) क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ही घटना आकुर्डी परिसरातील असून, शुभ डेव्हलपर्स या फर्मने आपल्या नवीन बांधकाम प्रकल्पाच्या प्रचारासाठी अभिनेत्री मलाइका अरोरा हिचे छायाचित्र जाहिरातीत (advertisement)वापरले होते. मात्र, हे छायाचित्र आक्षेपार्ह स्वरूपाचे असल्याने आणि त्यासाठी अभिनेत्रीची परवानगी न घेतल्यामुळे, एका सजग नागरिकाने याबाबत महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनंतर स्काय होल्डिंग विभागाने तपास केला असता, शुभ डेव्हलपर्सने अधिकृत मंजुरीशिवाय जाहिरात फलक उभारल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, संबंधित मेसर्स अप्सक्वर एचिव्हर्स एलएलपी या संस्थेला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरात कोणत्याही प्रकारची जाहिरात लावताना महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय लावण्यात आलेल्या जाहिरातींवर कठोर कारवाई सुरू राहील.

या घटनेनंतर नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या तात्काळ कारवाईचे कौतुक केले असून, सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह आणि अनधिकृत जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे हे पाऊल शहरातील नियमबाह्य जाहिरातींना आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचा संदेश ठरत आहे

हेही वाचा :

Samsung Galaxy S26 सिरीजच्या सर्व मॉडेल्सवर मिळणार 12GB Ram, स्टोरेजची क्षमताही वाढणार

वर्गात महिला शिक्षिका 3 शिक्षकांसोबत आक्षेपार्ह स्थितीत, शिपायाच्या लक्षात आलं अन् मग…

चिमुरडी शेकोटीजवळ खेळत असताना बिबट्याची झडप, तिला उचलून नेलं…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *