दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी रश्मिका मंदाना(kisses) आणि विजय देवरकोंडा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोघांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला असून, रश्मिकाच्या बोटातील अंगठीने त्या चर्चेला अधिक बळ दिलं आहे.ताज्या माहितीनुसार, या दोघांचा विवाह सोहळा नोव्हेंबरच्या अखेरीस उदयपूरमध्ये पार पडणार आहे. लग्नाची अधिकृत घोषणा अजून झाली नसली तरी, त्यांच्या वाढत्या सार्वजनिक जवळीकीने चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.

अलीकडेच रश्मिकाचा ‘द गर्लफ्रेंड’ हा तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाच्या यशानिमित्त हैदराबादमध्ये आयोजित कार्यक्रमात विजय देवरकोंडा स्वतः उपस्थित होता. कार्यक्रमादरम्यान विजयने रश्मिकाशी हातमिळवणी केली आणि सर्वांसमोर तिच्या हातावर किस (kisses)केला. या क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.हा व्हिडीओ पाहून नेटकरी आनंदाने भरून गेले आहेत. एका युजरने लिहिलंय, “हे दोघं एकमेकांसाठीच बनले आहेत.” तर दुसरा म्हणतो, “अखेर दोघं प्रेम व्यक्त करत आहेत, जोडी अफलातून दिसते!”

रश्मिका आणि विजय यांची जोडी प्रेक्षकांना ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटांपासूनच आवडू लागली होती. त्यानंतर दोघांनी बॉलिवूडमध्येही आपले पाय रोवले. रश्मिकाने ‘गुडबाय’, ‘ॲनिमल’, ‘छावा’ आणि ‘थामा’ यांसारख्या हिंदी चित्रपटांत काम केलं, तर विजयने ‘लायगर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.आता या दोघांचा विवाहसोहळा उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडणार असल्याचं समजतंय. चाहत्यांना त्यांच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने प्रतीक्षा आहे.

हेही वाचा :

आज 13 नोव्हेंबरचा दिवस या राशींसाठी भाग्याचा

Gemini AI मध्ये येणार Nano Banana चं नवीन वर्जन

आवळा मधाचा वापर करून ‘या’ पद्धतीमध्ये बनवा टेस्टी चटणी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *