बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल(Dhak Dhak)’ माधुरी दीक्षित आजही तिच्या नृत्य आणि अदाकारीसाठी प्रसिद्ध आहे. पण तिच्या कारकिर्दीतलं सर्वात वादग्रस्त आणि ऐतिहासिक गाणं म्हणजे ‘चोली के पीछे क्या है’. 1993 साली प्रदर्शित झालेल्या ‘खलनायक’ या चित्रपटातील हे गाणं रिलीज होताच अक्षरशः देशभरात चर्चेचा विषय ठरलं होतं.त्या काळात या गाण्याने विक्रमी लोकप्रियता मिळवली. फक्त एका आठवड्यात 1 कोटी ऑडिओ कॅसेट्स विकल्या गेल्या. हे त्या काळात अकल्पनीय मानलं जात होतं. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर बंदी घातली असूनही या गाण्याने सर्व विक्रम मोडले.

या गाण्याला लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलं तर आनंद बक्षी यांनी त्याचे आकर्षक बोल लिहिले. अलका याज्ञनिक आणि इला अरुण यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं. त्याचं कोरिओग्राफी दिग्गज सरोज खान यांनी केली होती. ज्यात राजस्थानी टच आणि पारंपरिक नृत्यशैलीचं सुंदर मिश्रण पाहायला मिळालं.‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याने दोन फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. ज्यामध्ये सर्वोत्तम गायिका अलका याज्ञनिक आणि सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन सरोज खान. माधुरी दीक्षितलाही या चित्रपटातील अभिनयासाठी फिल्मफेअर नामांकन मिळालं. जरी ती पुरस्कार जिंकू शकली नसली तरी.
गाणं रिलीज झाल्यानंतर लगेचच त्यावर द्विअर्थी आणि अश्लील असल्याचा आरोप झाला. अनेक सामाजिक संस्थांनी आणि राजकीय पक्षांनी त्याचा निषेध केला. परिणामी, दूरदर्शन आणि आकाशवाणीने या गाण्यावर बंदी घातली. तब्बल 30 हून अधिक संस्थांनी या गाण्याविरोधात आंदोलन केलं आणि काही ठिकाणी निर्मात्यांविरुद्ध तक्रारीही दाखल झाल्या.गायिका अलका याज्ञनिक यांनी मात्र या गाण्याचं समर्थन केलं होतं. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ‘त्या काळात मी इंडस्ट्रीत नवीन होते पण या गाण्यावर काम करणारी टीम दिग्गज होती. माधुरीसारखी(Dhak Dhak) कलाकार, घईसाहेबसारखे दिग्दर्शक, लक्ष्मीकांत-प्यारेलालसारखे संगीतकार आणि आनंद बक्षीसारखे गीतकार जर या गाण्याशी जोडले आहेत तर नक्कीच यामध्ये काहीतरी खास होतं. हे गाणं नॉटी, थोडं खट्याळ पण चुकीचं नव्हतं.’
‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं काळानुसार एक आर्टिस्टिक आणि बोल्ड एक्स्प्रेशन म्हणून स्वीकारलं गेलं. यानंतर हिंदी चित्रपटांमध्ये स्त्रीची अभिव्यक्ती, स्वातंत्र्य आणि सामाजिक दृष्टिकोन या विषयांवर नव्या चर्चांना प्रारंभ झाला.

हेही वाचा :
नवविवाहित जोडप्याला रोहित शर्माचं अनोखं गिफ्ट! वर्क आऊटदरम्यान केला भन्नाट डान्स, हिटमॅनला पाहून वराने जोडले हात; Video Viral
मलाइकाचा फोटो वापरून अनधिकृत जाहिरात; पालिकाने केली मोठी कारवाई
Samsung Galaxy S26 सिरीजच्या सर्व मॉडेल्सवर मिळणार 12GB Ram, स्टोरेजची क्षमताही वाढणार