लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या(Gold)-चांदीच्या भावात पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. काही दिवसांपासून स्थिर असलेले दर आता पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर ताण येण्याची शक्यता वाढली आहे.इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन च्या माहितीनुसार, 13 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव तब्बल ₹2,211 ने वाढून ₹1,26,124 प्रति 10 ग्रॅम झाला आहे. काल म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी हा दर ₹1,23,913 प्रति 10 ग्रॅम होता. यामुळे फक्त एका दिवसात सोने जवळपास ₹2,200 रुपयांनी महागले आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी उडी पाहायला मिळाली आहे. IBJA च्या आकडेवारीनुसार, चांदीचा दर ₹7,103 ने वाढून ₹1,63,808 प्रति किलो झाला आहे. मागील दिवशी तो ₹1,56,705 प्रति किलो होता. म्हणजेच एका दिवसातच चांदीत जवळपास ₹7,000 ची वाढ नोंदवली गेली आहे.या वर्षभरात सोन्या-चांदीच्या किमतींनी गुंतवणूकदार आणि ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचा(Gold) दर ₹76,162 प्रति 10 ग्रॅम होता. आता तोच दर ₹1,26,124 प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला आहे, म्हणजे जवळपास ₹49,962 रुपयांची वाढ!
तर, चांदीच्या किमतीतही आतापर्यंत ₹77,791 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षअखेर एक किलो चांदी ₹86,017 ला मिळत होती, तर आता ती ₹1,63,808 प्रति किलो झाली आहे.आजच्या तारखेला मुंबई आणि पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,27,800 प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,17,150 प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
22 कॅरेट सोन्यात 100 ग्रॅमसाठी ₹21,000 ची वाढ झाली असून 10 ग्रॅमसाठी दर ₹2,100 ने वाढला आहे. तर 18 कॅरेट सोन्यात 10 ग्रॅमसाठी ₹1,720 ची वाढ झाली असून हा दर आता ₹95,850 प्रति 10 ग्रॅम झाला आहे.सध्याच्या वाढत्या दरांमुळे लग्नसराईच्या हंगामात दागिने खरेदी करणाऱ्यांना अधिक खर्च करावा लागणार आहे. मात्र, गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिल्यास ही वाढ सोन्यातील स्थैर्य आणि मागणीचा सकारात्मक संकेत मानला जातो.

हेही वाचा :
धक-धक गर्लचा सर्वात वादग्रस्त पण सुपरहिट डान्स, एका आठवड्यात विकल्या 1 कोटी कॅसेट्स
सावधान, गुगलचा इशारा! मोफत वाय-फाय वापरताय? हॅकर्स करू शकतात तुमचा डेटा हॅक
‘कदाचित त्यामुळेच माझं नाव….’, अजित पवारांनी…