राष्ट्रवादी काँग्रेसने(Congress) स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आलेलं नाही. याआधी अजित पवारांनी त्यांची प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी केली होती. प्रवक्तेपदानंतर आता स्टार प्रचारकांच्या यादीतही स्थान देण्यात आलं नसल्याने रुपाली ठोंबरे पाटील यांचा संताप झाला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी आता आपल्या रोखठोक स्वभावाला जागत सगळेच राजकीय पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे. मी पुणे मनपाची निवडणूक लढणार असल्याने कदाचित या यादीत माझं नाव नसेल असं सांगतानाच आपल्याला इतर राजकीय पक्षांच्याही खुल्या ऑफर असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं आहे.

“माझ्याकडे जो खुलासा मागितला होता, त्याला मी कायदेशीर उत्तर दिलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि प्रदेशाध्यक्षा यांच्यासंदर्भात मी नेमकं कोणतं विधान केलं आहे याचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. राज्य महिला आयोग हे संवैधानिक पद असून, त्याचा पक्षाशी संबंध नाही. प्रदेशाध्यक्षांबद्दल तर मी काहीच म्हटलेलं नाही. त्यामुळे संपदा मुंडेंबाबत यांच्यासंदर्भात माझी जी भूमिका होती, त्यात चारित्र्यहनन झाल्याने महाराष्ट्राने केलेली मागणी मी सांगितली,” असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितलं आहे.
पुढे त्यांनी म्हटलं की, “सुनील तटकरे यांनी प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर केली असून, त्यात माझ्यासह माझ्यासह अमोल मिटकरी यांनाही वगळण्यात आलं आहे. त्यासंदर्भात मी अजित पवारांसंदर्भात चर्चा होणार आहे. स्टार प्रचारक यादीबद्दल बोलायचं गेल्यास मी स्वत: पुणे मनपा लढणार आहे. माझ्यावर कसबा मतदारसंघाची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे ही पक्षाची प्रक्रिया असते. त्यामुळे जे निवडणूक लढणार नाहीत, पक्षात आहेत त्यांची यादी जाहीर केली आहे. स्टार प्रचारक यादीत नसले तरी मीच निवडणूक लढणार असल्याने मी कुठे बाहेर जाऊच शकणार नाही”.
राष्ट्रवादी काँग्रेस(Congress) पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची वैचारिक व सर्वसमावेशक, पुरोगामी, परिवर्तनवादी समाजाभिमुख भूमिका आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, तळागाळातील जनसामान्यांपर्यंत परिणामकारक व प्रभावीरीत्या पोहोचावी आणि राष्ट्रवादी विचारांतून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शाश्वत विकासाची नवी नांदी व्हावी, हीच सदिच्छा! अशी पोस्ट पक्षाने शेअर केली आहे.
राष्ट्रवादी पक्षाने पाठवलेल्या शिस्तभंग नोटीसीला उत्तर म्हणून रूपाली ठोंबरे यांनी पक्षाला आज सविस्तर खुलासा पञ पाठवलं आहे. या खुलासा पञात रुपाली पाटील यांनी आपल्यावरील शिस्तभंगाचे आरोप तर फेटाळून लावले आहेत. तसंच डॉ. संपदा यांच्या चारित्र्यावर विधान करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर पक्षाने नेमकी काय शिस्तभंगाची कारवाई केली? असा जाहीर सवाल उपस्थित केला आहे. खुलासा पत्रात काय लिहिलं आहे ते वाचा.
प्रति,
श्री. संजय खोडके
संघटन सरचिटणीस
यास आपण दिनांक ०७/११/२०२५ रोजी जावक क्रमांक १३१३ द्वारा राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांच्या बाबतीत प्रसार माध्यमांमध्ये केलेले वक्तव्य पक्षशिस्त भंग करणारे आहे व त्यासंदर्भात शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत खुलासा पत्र मागवले आहे.त्याबाबत आपणास खुलासा येणेप्रमाणे राज्य महिला आयोग अध्यक्ष तसेच प्रदेशाध्यक्ष यांचे बाबत नक्की कोणते वक्तव्य शिस्तभंग करणारे आहे. याविषयी नोटीस मध्ये कोणताही माहिती नसल्याने त्याबाबत खुलासा देणे शक्य नाही. सविस्तर एखादे वाक्य आपण आपल्या नोटीसीमध्ये नमूद केले असते तर त्यावर मला खुलासा करणे योग्य झाले असते. तसेच राज्य महिला आयोग व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र विभाग आहेत.
त्यावर माझे सांगणे की, स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्या प्रकरणी राज्य महिला आयोगाने अध्यक्षा यांनी जे वक्तव्य केले होते त्यामध्ये समाज माध्यमांमध्ये तसंच लोकांमध्ये अत्यंत रोष. असंतोष निर्माण झाला होता. राज्य महिला आयोगाने केलेले वक्तव्याने पक्षालासुद्धा रोषाला सामोर जावे लागत होते. पक्षाची अत्यंत बदनामी झाली त्यानंतरून मी स्वतः बीड येथे जाऊन डॉक्टर संपदा मुंडे यांचे कुटुंबीय व आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. अजित दादा पवार यांची बोलणे करून दिले होते त्यावेळी देखील मा.दादांनी भी महिला आयोगाच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले होते.
मी केवळ राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मताचा सन्मान करून माझे म्हणणे मांडले होते. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची बाजू मांडणे हे प्रवक्त्याचे प्रथम कर्तव्य असताना सदरची नोटीस का देण्यात आली याची कल्पना नाही. त्यामुळे कोणताही शिस्त भंग झालेला नाही. तसेच याबाबत हा माझा खुलासा समजावा.

हेही वाचा :
नवविवाहित जोडप्याला रोहित शर्माचं अनोखं गिफ्ट! वर्क आऊटदरम्यान केला भन्नाट डान्स, हिटमॅनला पाहून वराने जोडले हात; Video Viral
मलाइकाचा फोटो वापरून अनधिकृत जाहिरात; पालिकाने केली मोठी कारवाई
Samsung Galaxy S26 सिरीजच्या सर्व मॉडेल्सवर मिळणार 12GB Ram, स्टोरेजची क्षमताही वाढणार